हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । १९ तारखेला रक्षाबंधन असून यानिमित्ताने काहीजण आपल्या बहिणीला किंवा भावांना गिफ्ट म्हणून सोने देतात. त्यामुळे रक्षाबंधनाच्या आधी सोने- चांदीच्या किमती (Gold Price Today) काय आहेत हे जाणून घेणं आवश्यक आहे. आज शनिवार १७ ऑगस्ट २०२४ रोजी म्हणजेच आठवड्याच्या बाजाराच्या शेवटच्या दिवशी सोने- चांदीच्या किमतीत वाढ पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर २४ कॅरेट १० ग्राम सोने 70960 रुपयांवर व्यवहार करत असून या किमतीत २२ रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या भावात सुद्धा २५ रुपयांची किरकोळ वाढ झाली असून एक किलो चांदीचा दर 83050 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
गुड रिटर्न वेबसाईट नुसार, २२ कॅरेट १० ग्राम सोन्याचा दर ६६७०० रुपये आहे तर २४ कॅरेट सोने ७२७७० रुपये प्रति तोळा आहे. तर एक किलो चांदीचा भाव ८६००० रुपये इतका आहे. तुम्ही घरबसल्या मिस्ड कॉलद्वारे सुद्धा सोन्या-चांदीची किंमत तपासू शकता. 22 कॅरेट सोन्याचे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. भारतात वेगवगेळ्या शहरानुसार सोन्या-चांदीचे भाव (Gold Price Today) सुद्धा वेगवेगळे आहेत.
गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-
पुणे- 66,700 रुपये
मुंबई – 66,700 रुपये
नागपूर – 66,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 72,770 रूपये
मुंबई – 72,770 रूपये
नागपूर – 72,770 रूपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.