Gold Price Today | भारतात वाढलेल्या महागाईमुळे नागरिक पूर्णपणे वैतागून गेले आहेत. पेट्रोल डिझेलनंतर आता रोजच्या वापरातील गोष्टी देखील महागल्यामुळे या नागरिकांनी आपला उदरनिर्वाह तरी कसा भागवावा हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुख्य म्हणजे, आता पेट्रोल डिझेलसोबत सोन्या चांदीच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सराफ बाजार सुन्न झाला आहे. आज (शनिवारी) सोन्याच्या किमतींमध्ये मोठी तेजी दिसून येत आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसू शकते.
रक्षाबंधननंतर सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये (Gold Price Today) कोणतेही घट झालेली नाही. शनिवारी, 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव थेट 55,150 रुपयांवर पोहचला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 60,150 रूपयांनी व्यवहार करत आहे. त्याचबरोबर गुडरिटर्न्सनुसार आज , 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 55,200 रुपये सुरू आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 60,220 रूपयांनी व्यवहार करत आहे. यातूनच सोन्याच्या किमती वाढल्याचे चित्र स्पष्ट होते.
गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव (Gold Price Today)
22 कॅरेट सोन्याचा दर आजचे भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 55,200 रुपये
मुंबई – 55,200 रुपये
नागपूर – 55,200 रूपये
24 कॅरेट सोन्याचा आजचे भाव (प्रति 10 ग्रॅम)
पुणे- 60,220 रूपये
मुंबई – 60,220 रूपये
नागपूर – 60,220 रुपये
चांदीचे आजचे भाव
सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या असताना चांदीचे भाव (Gold Price Today) मात्र घसरले आहेत. त्यामुळे आज चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना याचा मोठा फायदा होऊ शकतो. शनिवारी गुडरिटर्न्सनुसार, 10 ग्रॅम चांदी 769 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव, 7,690 रुपये असा सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदी 76,900 रुपयांनी व्यवहार करत आहे. तुम्हाला माहित असावे की गेल्या दोन महिन्यांपासून चांदीच्या किमतीत सतत होत आहे. मात्र सप्टेंबर महिना सुरू होताच हे भाव घसरले आहेत.
दरम्यान, श्रावण महिन्यात आलेल्या अनेक सणांमुळे सोने खरेदी करण्यावर जास्त भर दिला जात आहे बाजारात आलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या वेगवेगळ्या डिझाइन्स ग्राहकांना भूल पाडत आहेत. त्यामुळे या दागिन्यांकडे आकर्षित होऊन ग्राहक जास्त प्रमाणात सोने खरेदी करताना दिसतात. मात्र सोन्याच्या किमती वाढल्यामुळे हे दागिने खरेदी करण्यासाठी त्यांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत.