उदयनराजे आंदोलनस्थळी असतानाच पवारांची एंट्री!! जालन्यात मोठ्या घडामोडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शुक्रवारी जालन्यात मराठा आंदोलनात तरुणांवर झालेल्या लाठीचार्जचा संपूर्ण राज्यभरातून निषेध नोंदवला जात आहे तर या प्रकरणात विरोधकांनी देखील आक्रमकाची भूमिका घेतली असून त्यांच्याकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली जात आहे. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण पेटले असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) जालन्यात झालेल्या घटनास्थळी पोहोचले आहेत. महत्वाचे म्हणजे, नुकतेच खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) देखील जालन्यात उपोषणस्थळी दाखल झाले आहेत. महत्तवाचे म्हणजे उदयनराजे आंदोलनस्थळी स्टेजवर असतानाच शरद पवारांची एंट्री झाली. त्यामुळे जालन्यातील वातावरण ढवळून निघाले.

शरद पवार जालन्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी सर्वात प्रथम “आपण शांततेच्या मार्गाने संघर्ष करू” असे आवाहन आंदोलकांना केले आहे. तर दुसऱ्या बाजूला उदयनराजे भोसले हे आंदोलकांशी संवाद साधत आहेत. याचबरोबर, जालन्यात आयोजित करण्यात आलेला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम देखील पुढे ढकलण्यात आला आहे. दरम्यान, शरद पवार आणि उदयनराजे भोसले हे दोन्ही प्रमुख नेते घटनास्थळी असल्यामुळे त्यांच्याकडून या प्रकरणात नेमकी काय ठोस भूमिका घेतली जाईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शरद पवार काय म्हणाले?

जालन्यातील आंदोलकांशी संवाद साधताना शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही असे शरद पवार यांच्याकडून म्हणण्यात आले आहे. तसेच, “काल घडलेली घटना पाहून आज मी इथे पोहोचलो आहे, आपण शांततेच्या मार्गाने संघर्ष करू” असे आवाहन शरद पवारांनी केले आहे.

जालन्यात काय घडले?

गेल्या २९ ऑगस्टपासून जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू होते. या आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली होती. मात्र तरी देखील आंदोलन थांबवण्यात आले नाही. शुक्रवारी आंदोलनास्थळी थेट पोलीस दाखल झाले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये चर्चा झाली. यानंतर थेट पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. ज्यामुळे परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. आता या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यावर पडले आहेत. चहू बाजूंनी पोलिसांच्या या कारवाईचा निषेध केला जात आहे.