Tuesday, January 7, 2025

Gold Price Today : सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या; चांदीच्या किमतीवर काय परिणाम?

Gold Price Today | आज संपूर्ण राज्यात नागपंचमी सन साजरी करण्यात येत आहे. हिंदूरीतीने बाजारमध्ये आजच्या सणाला खास महत्त्व आहे. त्यामुळे आजच्या सणादिवशी सोने खरेदी करण्याला जास्त मान दिला जातो. त्यामुळे नागपंचमीनिमित्त सराफ बाजारात आज सोने खरेदी करण्यासाठी गर्दी जमली आहे. मात्र, नेमक्या अशावेळी सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. आज सोन्याच्या किंमतीत कमालीची वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात सोन्याच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे ग्राहकांना आज मोठा फटका बसला आहे.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी, MCX वेबसाईटवर सोन्याचा बाजार भाव (Gold Price Today) प्रति 10 ग्रॅमने 55,010 रुपयेच असा सुरू आहे. यासोबत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 60,010 रूपयांनी व्यवहार करत आहे. तर गुडरिटर्न्सनुसार देखील, आज सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. सोमवारी सराफ बाजारात, 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 54,150 रूपयांनीच स्थिर आहे. तसेच, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 59,070 रूपयांनी व्यवहार करत आहे. यातून सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या असल्याचे स्पष्ट होत आहे.

Gold Price Today
Gold Price Today

गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव-

(Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा दर आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 54,150 रुपये
मुंबई – 54,150 रुपये
नागपूर – 54,150 रूपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम)

पुणे- 59,070 रूपये
मुंबई – 59,070 रूपये
नागपूर – 59,070 रुपये

Gold Price Today
Gold Price Today

नागपंचमीच्या दिवशी महिला जास्त प्रमाणात चांदीचे पैंजण, मासोळ्या, इतर डाग दागिने करण्यावर जास्त भर देतात. खास म्हणजे, आजच्या दिवशी चांदीच्या किंमती उतरल्या आहेत. त्यामुळे आजचा दिवस चांदी खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी मानला जात आहे. सोमवारी बाजारात, 10 ग्रॅम चांदीची किंमत 733 रुपये अशी सुरू आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव बाजारात 7,330 रुपयांनी व्यवहार करत आहे. रविवारीनंतर आज देखील चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

Gold Price Today
Gold Price Today

नागपंचमी सण

आजचा नागपंचमी सण महाराष्ट्रात उत्साहात साजरी करण्यात येतो. आजच्या दिवशी पुरणपोळीचा गोड नैवेद्य नागदेवतेला देण्यात येतो. विशेष म्हणजे, आजच्या दिवशी अनेकजण मौल्यवान धातूची शंकराची पिंड, नागदेवता बनवून घेतात. तसेच, आजच्या दिवशी सोने खरेदी (Gold Price Today) करणे शुभ मानले जाते. त्यामुळे आज सोने खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे. मात्र दुसऱ्या बाजूला, सोन्या चांदीच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे ग्राहकांना खरेदीसाठी जरा जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत.