हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जुलै महिन्यात सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरांनी उसळी मारली आहे. मागील दोन महिन्यात सोन्या-चांदीच्या (Gold Price Today) भावांमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. मात्र आज 22 जुलै रोजी हेच भाव चांगलेच खाली घसरले आहेत. आज शनिवारी सोन्याचा भाव २५ रुपयांनी कमी झाला असून आज 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळा 54,514 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,470 रुपये प्रतितोळा आहे.
मे महिन्यात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ५८ हजार रुपयांपर्यंत कमी झाला होता. तर चांदी देखील ७२ हजार रुपये किलोच्या खाली आली होती. परंतु जून – जुलैच्या महिन्यात सोन्या-चांदीच्या (Gold Price Today) भावांना चांगलाच दर आला होता. या काळात सोन्याचा भाव ५९ हजार ३०० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ७५ हजार रुपये किलोच्या जवळ पोहोचली होती.
त्यानंतर आज गुडरिटर्न्सच्या मते, २२ कॅरेट सोन्याच्या एका ग्रॅमची किंमत ५,५१५, रुपयांवर तर २४ कॅरेट सोन्याच्या एका ग्रॅमची किंमत ६०१६ रुपयांवर पोहचली आहे. यामुळे सोने चांदी (Gold Price Today) खरेदी करणाऱ्यांसाठी ही संधी चांगली चालून आली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी बाजारात सोन्याची किंमत ५९ हजार प्रति १० ग्रॅमची अशी होती.
गुडरिटर्न्स नुसार, आजच्या सोन्याच्या किमती खालीलप्रमाणे- Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 54,514 रु.
मुंबई- 54,514 रु.
नागपूर – 54,514 रू.
24 कॅरेट सोन्याचा दर आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 59,470 रू.
मुंबई – 59,470 रू.
नागपूर – 59,470 रु.
चांदीचे भाव
तर दुसऱ्या बाजूला चांदीच्या दरात शुक्रवारी वाढ झालेली पाहायला मिळाली. शुक्रवारी चांदीचे भाव ७५४८९ रुपये प्रति किलोवर असे पाहिला मिळाले. सध्या चांदी जागतिक बाजारात २४.८२ डॉलर प्रति औंस वर व्यापार करत आहे. मात्र आज सोन्या-चांदीच्या (Gold Price Today) दरात पुन्हा घसरण झाली आहे. आज चांदी 74,980 रुपये प्रति किलोने विकली जात आहे . हेच दर मागील 2 दिवसांपूर्वी 76,480 रुपये प्रति किलो होते .
सोन्याची शुद्धता कशी तपासाल?-
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.