Gold Price Today : सोन्याच्या किमतींनी गाठला उच्चांक, मात्र चांदीच्या भावात नरमाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today | आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढत चाललेल्या महागाईमुळे सोन्या-चांदीच्या किमती देखील गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे मौल्यवान धातूंची खरेदी कधी करावी हा प्रश्न ग्राहकांपुढे येऊन ठेपला आहे. विशेष म्हणजे, गेल्या चार दिवसांपूर्वी सोन्या चांदीच्या किमती घसरल्या होत्या. मात्र आता पुन्हा सोन्याच्या किमतीत तेजी दिसून आली आहे. सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी सोन्याचे भाव वाढले आहेत. पुढील काही दिवस हे भाव असेच स्थिर राहतील असा अंदाज तज्ञांनकडून व्यक्त केला जात आहे.

Gold Price Today
Gold Price Today

स्थानिक पातळीवर सोन्या-चांदीचे रोजचे बदलते भाव (Gold Price Today) काही ठराविक वेबसाईटनुसार जाणून घेता येतात. बुधवारी MCX वेबसाईटवर सोन्याचा बाजार भाव प्रति 10 ग्रॅमने 55,110 रुपये असा सुरू आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 60,130 रूपयांनी व्यवहार करत आहे. त्याचबरोबर, गुडरिटर्न्सनुसारही बुधवारी सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. बुधवारी, 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 54,300 रूपयांनी वाढला आहे. तसेच, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 59,230 रूपयांनी व्यवहार करत आहे. स्थानिक पातळीवर देखील हेच भाव सुरू आहेत.

Gold Price Today
Gold Price Today

गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव (Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा दर आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 54,300 रुपये
मुंबई – 54,300 रुपये
नागपूर – 54,300 रूपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम)

पुणे- 59,230 रूपये
मुंबई – 59,230 रूपये
नागपूर – 59,230 रुपये

Gold Price Today
Gold Price Today

बुधवारी मौल्यवान चांदीचे भाव स्थिर आहेत. रोज होणाऱ्या बदलानंतर आज मात्र चांदीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे आजचा दिवस चांदी खरेदीसाठी योग्य ठरू शकतो. बुधवारी, 10 ग्रॅम चांदी 748 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव, 7,480 रुपये असा सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदी 74,800 रुपयांनी व्यवहार करत आहे. मंगळवारी सराफ बाजारात चांदी याच भावाने विकली जात होती. आजही चांदीच्या किमतीत बदल न झाल्यामुळे चांदी खरेदी करण्यासाठी जास्त गर्दी दिसत आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलर अजूनही मजबूत स्थितीत आहे. तर अमेरिकेत महागाईचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या सर्व घडामोडींचा परिणाम सोने चांदीच्या किमतींवर (Gold Price Today) होत आहे. अद्याप, सराफ बाजार येथील मूल्यवान धातूंना उसळी घेण्यास बळ मिळालेले नाही. त्यामुळे सातत्याने सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण होत आहे. तर सोन्या चांदीच्या किमतीत झालेल्या वाढीमध्ये देखील किंचित फरक दिसून येत आहे.