Gold Price Today : सोन्याच्या किमतींनी गाठला उच्चांक, मात्र चांदीत मोठी घसरण; जाणून घ्या आजचे भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today | रक्षाबंधन सणजवळ आल्यामुळे सराफ बाजारात सोने – चांदी खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी जमवली आहे. मात्र सध्या सोन्याचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांना ही खरेदी परवडत नसल्याचे चित्र दिसत आहे. शुक्रवारी म्हणजेच आज सराफ बाजारात सोन्याच्या किंमती स्थिर आहेत. तर चांदीचा भावात घसरण झाली आहे. मुख्य म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढलेल्या महागाईमुळे सोन्याच्या किमतीत वाढ होत असल्याचा अंदाज तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

शुक्रवारी MCX वेबसाईटच्या माहितीनुसार, सोन्याचा 10 ग्रॅमने बाजार भाव 55,220 असा सुरू आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 60,240 रूपयांनी व्यवहार करत आहे. हेच जर गुडरिटर्न्सनुसार पाहिले तर, आज सोन्याच्या किमती (Gold Price Today) कोणताही बदल झालेला नाही. शुक्रवारी, 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 54,500 रूपयांनीच सुरू आहे. त्याचबरोबर , 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 59,450 रूपयांनी व्यवहार करत आहे. स्थानिक पातळीवर देखील सोन्याच्या किंमती स्थिर आहेत.

Gold Price Today
Gold Price Today

गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव(Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा दर आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 54,500 रुपये
मुंबई – 54,500 रुपये
नागपूर – 54,500 रूपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम)

पुणे- 59,450 रूपये
मुंबई – 59,450 रूपये
नागपूर – 59,450 रुपये

Gold Price Today
Gold Price Today

चांदीचे भाव

गुडरिटर्न वेबसाईटनुसार, शुक्रवारी चांदीच्या किमतींमध्ये किंचित घसरण झाली आहे. आज 10 ग्रॅम चांदी 764 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव, 7,640 रुपये असा सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदी 76,500 रुपयांनी व्यवहार करत आहे. गुरुवारच्या भावानुसार आज 10 ग्रॅम चांदीमध्ये 5 रुपयांनी तर 100 ग्रॅम चांदीत 50 रुपयांनी घसरण झाली आहे.

दरम्यान, सध्या रक्षाबंधन सण तोंडावर आल्यामुळे सराफ बाजारात विशेष मुहूर्तावर सोने खरेदी करण्यात येत आहे. रक्षाबंधनच्या निमित्ताने चांदीच्या राख्यांना जास्त भाव (Gold Price Today) आहे. चांदीमध्ये अनेक वेगवेगळ्या डिझाईन आल्यामुळे साध्या राख्यांपेक्षा चांदीच्या राख्यांना जास्त मागणी वाढली आहे. मात्र अशा काळात मौल्यवान चांदीच्या किंमतीत सतत बदल होत असल्यामुळे त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे.