Gold Price Today | जागतिक पातळीवर सोन्या-चांदीच्या भावांमध्ये रोज चढ उतार पाहायला मिळत आहे. सध्या सोने-चांदी आणि इतर धातूंच्या भावांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. ही घसरण आजपर्यंत टिकून आहे. मंगळवारी भारतात 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 55,000 रुपयांनी सुरू आहे. तर सोने 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम 60,000 रुपयांनी सुरु आहे. यातूनच सोन्याचा आजच्या भावात देखील घसरण झाल्याचे चित्र आहे.
आज (Gold Price Today) चांदीच्या भावात देखील मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. बाजारात चांदीचा भाव 10 ग्रॅमने 7,70 रूपयांनी सुरु आहे. तर काल चांदीचा भाव 10 ग्रॅमने 775 रुपये असा सुरू होता. यातूनच चांदीचे आजचे भाव देखील घसरल्याचे दिसत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस सोन्या चांदीचे बदलते भाव बघून ग्राहकांनी योग्य वेळ बघून सराफ बाजारात खरेदी करावी.
अमेरिकेत होणाऱ्या केंद्रीय बँक यूएस फेडरल रिझर्व्हच्या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी आणि दर वाढीच्या अंदाजापूर्वीच डॉलर एक आठवड्याच्या उच्चांकावर पोहोचला आहे. यामुळेच सोने चांदी आणि इतर धातूंच्या किमती दबल्या गेल्या आहेत. परंतु सोमवारी सोन्याच्या भावात वाढ झाल्याची पाहायला मिळाली होती. काल बाजारात सोने 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम 60,160 रुपयांनी उंचावले होते. मात्र आज सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे खरेदीदारांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे.
गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव (Gold Price Today)
22 कॅरेट सोन्याचा दर आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 55,000 रुपये
मुंबई – 55,000 रुपये
नागपूर – 55,000 रूपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम)
पुणे- 60,000 रूपये
मुंबई – 60,000 रूपये
नागपूर – 60,000 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तपासावी?
सराफ बाजारात सोन्याच्या शुद्धतेमध्ये मोठी फसवणूक केल्याचे पाहायला मिळते. त्यासाठी यावर उपाय म्हणून सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक ॲप तयार करण्यात आले आहे. (BIS Care App) या ॲपद्वारे ग्राहक (Customer) सोन्याची शुद्धता तपासू शकतो. या ॲपद्वारे आपण सोन्याची शुद्धता पासून त्याबाबत तक्रार देखील नोंदवू शकतो. या ॲपमुळे सोन्याच्या शुद्धतेबाबत करण्यात आलेल्या फसवणुकीवर आळा बसल्यास मदत होते.