Gold Price Today : बाजाराच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत घसरण; आजचे भाव इथे करा चेक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सोमवार २९ एप्रिल २०२४ रोजी बाजाराच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत (Gold Price Today)किरकोळ घसरण पाहायला मिळाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर १० ग्राम २४ कॅरेट सोने 72087 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या किमतीत 0.03% म्हणजेच 20 रुपयांची घट झाली आहे. तर एक किलो चांदी 80637 रुपयांवर व्यवहार करत आहे. चांदीचेदर सुद्धा 140 रुपयांनी स्वस्त झालेत. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

दुसरीकडे गुड रिटर्न वेबसाईट नुसार, १० ग्राम २२ कॅरेट सोन्याची किंमत 66700 रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव 7,2750 रुपये आहे. तर चांदीची किंमत प्रतिकिलो ८४००० रुपये आहे.मागील २-३ महिन्यापासून सोन्याच्या किमतीत चढ- उतार हे असेच सुरु आहेत. परंतु सध्याचा काळ हा लग्नसराईतचा असून या काळात सोन्याला चांगली मागणी पाहायला मिळते. त्यामुळे ग्राहकवर्गाचे सोन्याच्या भावावर (Gold Price Today) बारकाईने लक्ष्य असते.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 66,550 रुपये
मुंबई – 66,550 रुपये
नागपूर – 66,550 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम) Gold Price Today

पुणे- 72,600 रूपये
मुंबई – 72,600 रूपये
नागपूर – 72,600 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.