Gold Price Today : सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक; खरेदीदारांच्या खिशाला चाप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today : सोन्याच्या किमतीमध्ये मागील काही महिन्यापासून सुरु असलेली वाढ आजही सुरूच आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर १० ग्राम २४ कॅरेट सोने 69280 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या दरात 0.69% म्हणजेच 478 रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला चाप बसत आहे. सध्याचा काळ हा लग्नसराईतचा असल्याने सराफा बाजारात ग्राहकांची वर्दळ पाहायला मिळत आहे. मात्र सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे कुठे तरी खरेदीदारांमध्ये नाराजी आहे.

आज MCX वर सकाळी ९ वाजता १० ग्राम २४ कॅरेट सोन्याचा भाव ६९२५० रुपयांपासून (Gold Price Today) सुरु झाला, त्यानंतर काहीच क्षणात सोन्याच्या किमतीने किमतींनी उसळी घेतली. १० वाजता सोन्याचे दर ६९,३५० रुपयावर पोचले. त्यानंतर सोन्याच्या किमतीत चढ- उतार सुरूच राहिले.. सध्या १२ वाजता सोन्याच्या किमतीत थोडीफार घसरण होऊन १० ग्राम २४ कॅरेट सोने ६९२१० रुपयांवर व्यवहार करत आहे. .. तर MCX वर एक किलो चांदीचा दर 78203 रुपये आहे. चांदीच्या किमतीमध्ये तब्बल 1167 रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे.

Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- (Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 64,100 रुपये
मुंबई – 64,100 रुपये
नागपूर – 64,100 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 69,870 रूपये
मुंबई – 69,870 रूपये
नागपूर – 69,870 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.