Gold Price Today | आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या महागाईमुळे स्थानिक पातळीच्या सोन्या-चांदीच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना सोने खरेदी करण्यासाठी मोठी अडचण येत आहे. मुख्य म्हणजे, रक्षाबंधन नंतर देखील सोन्या-चांदीचे भाव उतरलेले नाहीत. आज पुन्हा या भावांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सोन्या चांदीचे हे भाव पुढील काही दिवस कायम राहतील असा अंदाज तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. यामुळेच ग्राहकांनी देखील सोने खरेदी करण्यासाठी जाताना एकदा तरी या किमती तपासायला हव्यात.
रक्षाबंधन सनानिमित्त आता सोन्या-चांदीच्या किमतीत (Gold Price Today) आणखीन एक पटीने वाढ झाली आहे. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव थेट 55,150 रुपयांवर पोहचला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 60,150 रूपयांनी व्यवहार करत आहे. त्याचबरोबर गुडरिटर्न्सनुसार गुरुवरीत, 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 55,150 रुपये सुरू आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 60,160 रूपयांनी व्यवहार करत आहे. सोन्याचे वाढलेले हे भाव ग्राहकांना परवडण्याच्या बाहेर गेले आहेत.
गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव (Gold Price Today)
22 कॅरेट सोन्याचा दर आजचे भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 55,150 रुपये
मुंबई – 55,150 रुपये
नागपूर – 55,150 रूपये
24 कॅरेट सोन्याचा आजचे भाव (प्रति 10 ग्रॅम)
पुणे- 60,160 रूपये
मुंबई – 60,160 रूपये
नागपूर – 60,160 रुपये
चांदीचे आजचे भाव
रक्षाबंधन नंतर मौल्यवान चांदीच्या भावात कोणतेही बदल झालेले नाहीत. त्यामुळे सराफ बाजारात आजही चांदीचे भाव स्थिर आहेत. मात्र या चांदीच्या किमतींमध्ये कोणतीही घसरत झालेली नाही. आज देखील गुडरिटर्न्सनुसार, 10 ग्रॅम चांदी 776 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव, 7,760 रुपये असा सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदी 77,600 रुपयांनी व्यवहार करत आहे.
तुम्हाला हे माहित असावे की गेल्या दोन महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या भावात (Gold Price Today) सतत बदल होत आहेत. मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून सोन्या चांदीच्या भावाने उच्चांक गाठला होता. सणासुदीच्या काळात हे भाव उतरतील असा अंदाज व्यक्त केला जात असताना या भावांमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. त्यामुळे सध्याच्या काळात सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांना चांगला फटका बसत आहे.