Gold Price Today : सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अत्यंत निराशाजनक बातमी आहे. आज बुधवारी म्हणजेच ६ मार्च २०२४ रोजी सोन्याच्या किमतीती मोठी उसळी पाहायला मिळाली. MCX वर आज प्रथमच 65140 रुपयांची पातळी गाठली. तर दुसरीकडे चांदीच्या दरात सुद्धा सुमारे तीन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ६४,९३० रुपये आहे तर चांदीची किंमत प्रति किलो ७३,२४० रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
MCX वर आज सोन्याचा भाव (Gold Price Today) सकाळी ६४, ७२४ रुपयांवर व्यवहार करत होता. त्यानंतर तो ६४,७७५ पर्यंत उच्चांकी पातळीवर गेला. परंतु नंतर लगेचच त्यात थोडी घट होत सध्या १२ वाजता सोने ६४, ७४५ रुपयांवर व्यवहार करत आहेत. तर गुडरीटर्न नुसार, आज 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा ५९,९५० रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा ६५, २८० रुपये आहे.
Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- (Gold Price Today)
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 59,700 रुपये
मुंबई – 59,700 रुपये
नागपूर – 59,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 65,230 रूपये
मुंबई – 65,230 रूपये
नागपूर – 65,230 रूपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.