हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत आज मोठी घसरण झाली असून त्याची किंमत 6 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. सोन्यावरील आयात शुल्कात कपात करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर ही घसरण झाली आहे. सोन्याबरोबरच आज सकाळी चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे.
आज सकाळी MCX वर 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव 79 रुपयांनी घसरून 49,233 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. आज सोन्याचे ट्रेडिंग 49,220 रुपयांपासून सुरू झाले. एकदा त्यात किंचित सुधारणा झाली आणि किंमत 49,242 रुपयांपर्यंत गेली. मात्र नंतर तो 49233 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरला. आज सकाळी MCX वर चांदीच्या किंमतीतही घसरण झाली आहे. शुक्रवारी चांदीच्या दरात 62 रुपयांची घसरण झाली असून, दर 56,355 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. आज चांदीचे ट्रेडिंग 56,295 रुपयांपासून सुरू झाला. Gold Price Today
आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ झाली आहे. आज सोन्याचा भाव 0.11 टक्क्यांनी वाढून 1664.51 डॉलर प्रति औंस झाला आहे. त्याचप्रमाणे आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या स्पॉट प्राईसमध्येही वाढ झाली आहे. चांदी 1.17 टक्क्यांच्या वाढीसह 19.19 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहे. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,830 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,980 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,960 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,830 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,980 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 46,800 रुपये
पुणे – 45,830 रुपये
नागपूर – 45,830 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 49,960 रुपये
पुणे – 50,430 रुपये
नागपूर – 50,430 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
Gram | 22 Carat Gold Yesterday | 22 Carat Gold Today | Daily Price Change |
1 GRAM | Rs 4623.00 | Rs 4643.00 | 0.431 %⌃ |
8 GRAM | Rs 36984 | Rs 37144 | 0.431 %⌃ |
10 GRAM | Rs 46230 | Rs 46430 | 0.431 %⌃ |
100 GRAM | Rs 462300 | Rs 464300 | 0.431 %⌃ |
PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)
Gram | 24 Carat Gold Yesterday | 24 Carat Gold Today | Daily Price Change |
1 GRAM | Rs 5043.00 | Rs 5065.00 | 0.434 %⌃ |
8 GRAM | Rs 40344 | Rs 40520 | 0.434 %⌃ |
10 GRAM | Rs 50430 | Rs 50650 | 0.434 %⌃ |
100 GRAM | Rs 504300 | Rs 506500 | 0.434 %⌃ |
हे पण वाचा :
Card Payment : ATM, डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या
LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये दररोज 238 रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा 54 लाख रुपये !!!
Bank FD : आता ‘या’ 2 मोठ्या बँकांनी देखील FD वरील व्याजदरात केली वाढ !!!
Gold Price : गेला संपूर्ण आठवडा सराफा बाजाराची स्थिती कशी होती ??? जाणून घ्या
DBS Bank ने FD वरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन व्याजदर