नवी दिल्ली । सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये चढ-उतार सुरूच आहेत. दोन दिवसांच्या वाढीनंतर सोन्याच्या किंमतीची आज वाढीची नोंद झाली तर आज चांदीच्या किंमतीत कमालीची वाढ दिसून आली. या वाढीनंतर चांदीची किंमत 74,000 रुपये प्रति किलो झाली आहे.
मंगळवारी भारतीय बाजारात सोन्याच्या चांदीच्या किंमतीत घसरण नोंदली गेली. मंगळवारी MCX वरील सोन्याचा वायदा दर प्रति 10 ग्रॅम 0.11% खाली घसरून 48,420 वर आला तर चांदीचा वायदा दर 0.83 % वाढून 74,000 रुपये प्रति किलो झाला.
सोन्याच्या नवीन किंमती : मंगळवारी MCX वरील सोन्याचे वायदा दर 0.11% ने कमी होऊन ते प्रति 10 ग्रॅम 48,420 वर ट्रेड करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्याच्या स्पॉट प्राइसमध्ये घसरण नोंदली गेली.
चांदीच्या नवीन किंमती : चांदीच्या भावातही आज मोठी वाढ नोंदली गेली. चांदीचा वायदा दर आज 0.83% वाढीसह 73,930 रुपये प्रतिकिलोवर आला.
अशा प्रकारे आपण सोन्याची शुद्धता तपासू शकता : BIS Care app वरून ग्राहक (Consumer) सोन्याची शुद्धता (Gold Purity) तपासू शकतात. या अॅपद्वारे आपण केवळ सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर त्यासंबंधात कोणतीही तक्रार देखील करू शकता. या अॅपमध्ये वस्तूंचा लायसन्स, रजिस्ट्रेशन आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अॅप (App) च्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा