हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24-कॅरेट शुद्धतेच्या सोन्याची फ्युचर्स किंमत 0.44 टक्क्यांनी घसरून 52,030 रुपये प्रति ग्रॅम झाली. तर आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदीचा भाव 66,600 रुपये प्रतिकिलो होता. आज चांदीच्या दरातही 0.2 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,040 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव -53,490 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,990रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,440 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,040 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,490 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.
Today 24 Carat Gold Price per gram
Gram | 24 Carat Gold Yesterday | 24 Carat Gold Today | Daily Price Change |
1 GRAM | Rs 5349.00 | Rs 5350.00 | 0.019 %⌃ |
8 GRAM | Rs 42792 | Rs 42800 | 0.019 %⌃ |
10 GRAM | Rs 53490 | Rs 53500 | 0.019 %⌃ |
100 GRAM | Rs 534900 | Rs 535000 | 0.019 %⌃ |
Today 22 Carat Gold Price per gram
Gram | 22 Carat Gold Yesterday | 22 Carat Gold Today | Daily Price Change |
1 GRAM | Rs 4904.00 | Rs 4905.00 | 0.02 %⌃ |
8 GRAM | Rs 39232 | Rs 39240 | 0.02 %⌃ |
10 GRAM | Rs 49040 | Rs 49050 | 0.02 %⌃ |
100 GRAM | Rs 490400 | Rs 490500 | 0.02 %⌃ |