हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक बाजारातील नरमाईमुळे आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्यामध्ये घसरून होऊन ते 51 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम वर आले आहे तर चांदी 64 हजार रुपयांपेक्षा कमीने विकली जात आहे. आज MCX वर 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 242 रुपयांनी घसरून 50,957 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली.
MCX वर आज सकाळी चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. जूनमधील डिलिव्हरीसाठीच्या चांदीची किंमत 780 रुपयांनी घसरून 63,900 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. गेल्या काही सत्रांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण पहायला मिळत आहे.
जागतिक बाजाराबद्दल बोलायचे झाल्यास आज तिथेही सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. आजच्या ट्रेडिंगमध्ये सोन्याची स्पॉट प्राईस 0.20 टक्क्यांनी घसरून 1,882.49 डॉलर प्रति औंस झाली आहे. जागतिक बाजारात चांदीच्या किंमतीतही घसरण झाली असून आजच्या ट्रेडिंगमध्ये स्पॉट प्राईस 0.10 टक्क्यांनी घसरून 23.26 डॉलर प्रति औंस झाली.
चांदी व्यतिरिक्त, प्लॅटिनमची किंमत 0.40 टक्क्यांनी कमी होऊन ते $ 914.17 वर विकले जात आहे. पॅलेडियम देखील 1.2 टक्क्यांनी स्वस्त होऊन $2,228.75 वर विकले जात आहे.
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,080 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव -52,450 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,000 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,370 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,080 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,450 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 48,000 रुपये
पुणे – 48,080 रुपये
नागपूर – 48,080 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 52,370 रुपये
पुणे -52,450 रुपये
नागपूर – 52,450 रुपये
PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
Gram | 22 Carat Gold Yesterday | 22 Carat Gold Today | Daily Price Change |
1 GRAM | Rs 4850.00 | Rs 4850.00 | 0 % |
8 GRAM | Rs 38800 | Rs 38800 | 0 % |
10 GRAM | Rs 48500 | Rs 48500 | 0 % |
100 GRAM | Rs 485000 | Rs 485000 | 0 % |
PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)
Gram | 24 Carat Gold Yesterday | 24 Carat Gold Today | Daily Price Change |
1 GRAM | Rs 5291.00 | Rs 5291.00 | 0 % |
8 GRAM | Rs 42328 | Rs 42328 | 0 % |
10 GRAM | Rs 52910 | Rs 52910 | 0 % |
100 GRAM | Rs 529100 | Rs 529100 | 0 % |