Gold-Silver Price : सोने झाले स्वस्त, चांदीच्या दरातही घसरण; आजची किंमत पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचा भाव 195 रुपयांनी घसरून 46,625 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतीत झालेली वाढ आणि रुपयाची घसरण यामुळे हे घडले आहे. मागील ट्रेडिंगमध्ये सोन्याचा भाव 46,430 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता.

चांदीचा भाव 569 रुपयांनी घसरला
त्याच वेळी, चांदीचा भावही 569 रुपयांनी घसरून 61,763 रुपये प्रति किलो झाला आहे. मागील ट्रेडिंगमध्ये चांदीचा भाव 61,194 रुपये प्रति किलो होता. गुरुवारी सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 15 पैशांनी घसरून 74.55 वर आला. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,190 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,440 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,620 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,720 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,620 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,720 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 46,620 रुपये
पुणे – 46,190 रुपये
नागपूर – 46,620 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई -47,720 रुपये
पुणे – 49,440 रुपये
नागपूर – 47,720 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4620.00 Rs 4632.00 0.259 %⌃
8 GRAM Rs 36960 Rs 37056 0.259 %⌃
10 GRAM Rs 46200 Rs 46320 0.259 %⌃
100 GRAM Rs 462000 Rs 463200 0.259 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4945.00 Rs 4959.00 0.282 %⌃
8 GRAM Rs 39560 Rs 39672 0.282 %⌃
10 GRAM Rs 49450 Rs 49590 0.282 %⌃
100 GRAM Rs 494500 Rs 495900 0.282 %⌃

 

Leave a Comment