यंदाचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | यंदाचे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरला न होता मुंबईतच होणार असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. 22 ते 28 डिसेंबरपर्यंत अधिवेशन होणार आहे. दरम्यान मुंबईत अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे विरोधक आगोदरच आक्रमक होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वीच मानेची शस्त्रक्रिया झाली आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंना डिस्चार्ज अद्याप मिळालेले नसल्यामुळे ही सगळी परिस्थिती पाहता महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुख मंत्र्यांनी हे अधिवेशन मुंबईत घ्याव, असे एकमताने ठरवले आहे.

दरम्यान, या अधिवेशनात शेतकऱ्यांची होणारी वीज तोडणी, एसटी कामगारांचा प्रश्न आणि अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला लक्ष्य करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, आर्यन खान प्रकरण आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा मुद्दा उपस्थित करत राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून भाजपवर निशाणा साधला जाऊ शकतो. त्यामुळे हे अधिवेशन चांगलंच गाजण्याची शक्यता आहे.

Leave a Comment