नवी दिल्ली । केंद्रीय तपास संस्था CBIच्या गलथानपणाची एक धक्कादायक घटना तामिळनाडूमध्ये समोर येत आहेत. सीबीआयने छापेमारी दरम्यान 103 किलो ग्रॅम सोनं जप्त केलं होतं. या सोन्याची एकूण किंमत तब्बल 45 कोटी होती. मात्र सीबाआयच्या ताब्यात असलेलं हे सोनं आता अचानक गायब झालं आहे. कोर्टाने या प्रकरणात तामिळनाडू सीबी-सीआयडीला चौकशीचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयच्या टीमने 2012 साली चेन्नईमधील सुराना कॉर्पोरेशन लिमिटेडच्या ऑफिसवर छापा टाकला होता. या कारवाईत सोन्यांच्या विटा आणि दागिन्यांच्या स्वरुपात 400.5 किलो ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं होतं. हे सर्व सोनं सीबीआयच्या सेफ कस्टडीमध्ये ठेवण्यात आलं होते. मात्र आता यामधील तब्बल 103 किलोग्रॅम सोनं गायब असल्याचं उघड झालं आहे.
सोनं ज्या सेफ कस्टडीमध्ये ठेवण्यात आलं होतं त्याच्या 72 किल्ली चेन्नईच्या प्रिन्सिपल स्पेशल कोर्टाला देण्यात आल्या होत्या असा दावा सीबीआयने केला आहे. छापेपारीच्या दरम्यान सीबीआयनं सर्व सोनं एकत्र आणलं होतं. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि सुराना कॉर्पोरेशन यांच्यातील वादावर तोडगा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या लिक्विडेटरला हे सोनं सोपवताना त्याची विभागणी करण्यात आली होती. याच कारणामुळे सोन्याच्या वजनात आता फरक पडला असल्याचं स्पष्टीकरण सीबीआयनं दिलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’