नवी दिल्ली । गुगल भारतात आपले नवीन ऑफिस उघडणार आहे. गुगलचे हे नवे ऑफिस पुण्यात असेल. या वर्षाच्या उत्तरार्धात हे ऑफिस सुरू होण्याची अपेक्षा आहे. गुगलने यासाठी भारतात भरतीही सुरू केली आहे. गुगलच्या गुरुग्राम, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये ही भरती केली जात आहे.
भारतातील गुगल क्लाउड इंजिनीअरिंगचे व्हीपी अनिल भन्साळी म्हणाले की,”भारत हे तंत्रज्ञान आणि नवनिर्मितीचे केंद्र बनले आहे. गुगल क्लाउडसाठी आवश्यक असलेले टॅलेंट पूल भारतात आहे. याच कारणामुळे गुगलसाठी भारत सर्वोत्तम स्थान आहे.” भन्साळी पुढे म्हणाले की,”गेल्या 12 महिन्यांत कंपनीने भारतात उभारल्या जाणाऱ्या डेव्हलपमेंट सेंटरसाठी भारतातील टॉप इंजीनियरिंग टॅलेंटची नियुक्ती केली आहे. आमच्या जागतिक इंजीनियरिंग टीमच्या सहकार्याने ते प्रगत क्लाउड तंत्रज्ञान विकसित करतील.”
भरती सुरू झाली आहे
भन्साळी म्हणाले की,”आयटी हब म्हणून पुण्यातील आमचा विस्तार आम्हाला टॉप टॅलेंटमध्ये सहभागी होण्यास मदत करेल. वाढत्या ग्राहक वर्गाला प्रगत क्लाउड कॉम्प्युटिंग सोल्यूशन्स, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिस देण्यासाठी Google हे ऑफिस उघडत आहे. पुणे ऑफिस Google क्लाउडच्या जागतिक इंजीनियरिंग टीमच्या सहकार्याने प्रगत एंटरप्राइझ क्लाउड तंत्रज्ञान तयार करेल, रिअल-टाइम टेक्नॉलोजी सल्ला आणि प्रॉडक्ट्स आणि अंमलबजावणी कौशल्य देईल.”