नवी दिल्ली । कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी बुधवारी शेतकऱ्यांना डाळी आणि तेलबिया यांचे उच्च उत्पादन देणारे बियाणे वाटप करण्यासाठी ‘मिनीकीट’ कार्यक्रम (Minikit Programme) सुरू केला. ही मिनी किट राष्ट्रीय बियाणे महामंडळ (NCS), नाफेड आणि गुजरात राज्य बियाणे कॉर्पोरेशन यासारख्या राष्ट्रीय संस्थांकडून पुरविल्या जात आहेत आणि केंद्र सरकार त्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशनच्या माध्यमातून संपूर्णपणे आर्थिक मदत करत आहे.
बियाण्यांच्या या ‘मिनी किट’ कार्यक्रमाची सुरुवात कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांच्या हस्ते करताना शेतकऱ्यांना डाळी आणि तेलबिया यांचे उच्च उत्पादन देणारे बियाण्यांचे वाटप करण्यात आले. तोमर म्हणाले की,”केंद्र सरकार राज्यांच्या सहकार्याने डाळी आणि तेलबियांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविते.
डाळी आणि तेलबियांचे वाढलेल उत्पादन
कृषी मंत्रालयाने म्हटले आहे की, 2014-15 पासून डाळी आणि तेलबियांच्या उत्पादनात वाढ करण्यावर ताजी लक्ष दिले जात आहे. तेलबियांचे उत्पादन 2014-15 मध्ये 2.751 कोटी टनांवरून 2020-21 मध्ये 3.657 कोटी टनांपर्यंत वाढले. याच काळात डाळीचे उत्पादन 1.715 कोटी टनांवरून 2.556 कोटी टनांपर्यंत वाढले आहे.
15 जून 2021 पर्यंत वितरण सुरू राहील
या मिनी किट कार्यक्रमांतर्गत बियाण्यांचे वाटप 15 जून 2021 पर्यंत सुरू राहील जेणेकरून खरीप पिकांच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना बियाणे मिळतील. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत डाळींच्या एकूण 20,27,318 मिनी किट, सोयाबीनच्या आठ लाखाहून अधिक मिनी किट आणि शेंगदाण्याच्या 74,000 मिनी किट शेतकऱ्यांना मोफत देण्यात येतील.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा