IT क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या फ्रेशर्ससाठी खुशखबर; ‘या’ कंपन्यानी वाढवले भरतीचे टार्गेट

Job
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतात या वर्षी डिजिटल आणि आयटी कंपन्यांमध्ये नोकऱ्यांचा पाऊस पडणार आहे. HCL, Wipro सह इतर अनेक कंपन्यांनी फ्रेशर्सची नियुक्ती करण्याचे त्यांचे लक्ष्य पूर्वीपेक्षा जास्त वाढवले ​​आहे.

देशातील सर्वात मोठी IT कंपनी असलेल्या TCS ने चालू आर्थिक वर्षात 40 हजार पदवीधर म्हणजेच फ्रेशर्सची भरती करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गेल्या वर्षीही TCS ने सुमारे एवढ्याच भरती करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, मात्र कंपनीने या तुलनेत एक लाख नवीन नियुक्त्या केल्या.

Wipro ने चालू आर्थिक वर्षात 30 हजार भरतीचे लक्ष्य ठेवले आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. गेल्या आर्थिक वर्षात विप्रोने 17,500 नियुक्त्या केल्या होत्या.

देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या Infosys ने यावर्षी 50,000 फ्रेशर्सची नियुक्ती करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, कंपनी यापेक्षाही अधिक नियुक्त्या करू शकते. गेल्या वर्षी, Infosys ने 85,000 नवीन नियुक्त्या केल्या होत्या.

HCL ने यावर्षीच्या भरतीचे लक्ष्य 45 हजार केले आहे तर गेल्या वर्षी त्यांनी 22 हजार नियुक्त्या केल्या होत्या.

फ्रेंच IT कंपनी Capgemini ने यावर्षी 60 हजार लोकांना नोकरी देण्याची योजना आखली आहे. त्याचे जवळपास निम्मे कर्मचारी भारतात आहेत.

याशिवाय अनेक आयटी कंपन्या फ्रेशर्सची नियुक्ती करण्याच्या तयारीत आहेत. डिजिटल पेमेंट फर्म PhonePe 2,800 लोकांना कामावर घेण्याची योजना आखत आहे. दुसरीकडे, Fintech BankBazaar 1,500 लोकांना नोकरी देण्याची योजना आखत आहे.