SBI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! कार लोनसहित अनेक प्रकारच्या लोनवरील प्रोसेसिंग फीसमध्ये मिळणार सूट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने रिटेल लोन आणि डिपॉझिट्सवर विशेष ऑफर जाहीर केली आहे, ज्यामुळे त्यांच्या 44 कोटी ग्राहकांना चांगली बातमी मिळाली आहे. या अंतर्गत बँकेच्या ग्राहकांना कार, पर्सनल, पेन्शन आणि गोल्ड लोन वरील प्रोसेसिंग फीस पासून पूर्ण सूट देण्यात येत आहे. खरे तर केंद्र सरकारने स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त अमृत महोत्सवाची घोषणा केली आहे. SBI ने स्वातंत्र्याच्या या सणानिमित्त ग्राहकांसाठी ही विशेष ऑफर दिली आहे. एवढेच नाही तर बँकेने FD वरील व्याजदर वाढवण्याची घोषणाही केली आहे. बँक कोणत्या लोनवर (SBI Loans) कोणत्या सुविधा पुरवत आहे ते जाणून घ्या.

SBI कार लोनवर ‘या’ सुविधा देत आहे
होम लोन नंतर, SBI ने आता कार लोन घेण्यासाठीचे प्रोसेसिंग फी 100% माफ करण्याची घोषणा केली आहे. एवढेच नाही तर ग्राहकांना कार लोनवर 90% पर्यंत ऑन-रोड फायनान्सिंग सुविधा देखील दिली जाईल. याशिवाय, SBI च्या YONO App वरून कार लोन साठी अर्ज केल्यावर व्याजदरात 0.25 टक्के अतिरिक्त सूट देखील दिली जाईल. सोप्या शब्दात समजून घ्यायचे, जर तुम्ही YONO App वरून कार लोन साठी अर्ज केला तर तुम्हाला फक्त 7.5 टक्के वार्षिक व्याज भरावे लागेल.

पर्सनल लोनसाठी बँक स्पेशल ऑफर
ग्राहकांनी पर्सनल लोनसाठी कोणत्याही मोडद्वारे अर्ज केल्यास त्यांना प्रोसेसिंग फीमध्ये 100% सूट मिळेल. दुसऱ्या शब्दांत समजून घ्यायचे, जर तुम्ही YONO App किंवा शाखेला भेट देऊन पर्सनल लोनसाठी अर्ज केला, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फी भरावी लागणार नाही. कोणत्याही माध्यमातून पेन्शन लोनसाठी अर्ज करताना ग्राहकांना समान सुविधा मिळेल. त्याचबरोबर बँकेने कोरोना योद्धांसाठी व्याजदरात 0.50 टक्के अतिरिक्त सूट जाहीर केली आहे. सोप्या शब्दात, कोरोना वॉरियर्सला पर्सनल लोनसाठी सामान्य ग्राहकांच्या तुलनेत 0.50 टक्के कमी दराने लोन मिळेल. त्यांना लवकरच कार आणि गोल्ड लोनवर ही सवलत मिळण्यास सुरुवात होईल.

7.5% दराने गोल्ड लोन उपलब्ध होईल
स्टेट बँक ऑफ इंडिया अमृत महोत्सवाअंतर्गत गोल्ड लोन घेण्यासाठी व्याजदरात 0.75 टक्के सूट देत आहे. SBI कोणत्याही पद्धतीद्वारे गोल्ड लोनसाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांकडून फक्त 7.5 टक्के वार्षिक व्याज आकारेल. हे विशेष आहे की, YONO App वरून सुवर्ण कर्जासाठी अर्ज केल्यावर संपूर्ण प्रोसेसिंग फी माफ केली जाईल. एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक (रिटेल आणि डिजिटल बँकिंग) सीएस शेट्टी म्हणाले की,”सणासुदीच्या काळात बँकेच्या सर्व किरकोळ ग्राहकांसाठी विविध ऑफर्सची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे, ग्राहक लोन घेण्यावर अधिक बचत करतील.”

प्लॅटिनम टर्म डिपॉजिट्सतर्गत जास्त व्याज
एसबीआयने रिटेल डिपॉजिटर्स साठी प्लॅटिनम टर्म डिपॉजिट्स योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांना 75 दिवस, 75 आठवडे आणि 75 महिने टर्म डिपॉजिट्स वर 0.15 टक्के अतिरिक्त व्याज मिळेल. ही ऑफर फक्त 15 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2021 पर्यंत उपलब्ध असेल. बँकेने म्हटले आहे की,” ग्राहकांना ही ऑफर नवीन किंवा रिन्‍यू केल्या जाणाऱ्या डिपॉजिट्सवर 2 कोटी किंवा त्यापेक्षा कमी रकमेसाठी मिळेल.”

Leave a Comment