हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकने नुकतेच ‘Facebook Shops’ या नावाने नवीन सर्व्हिस सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. कंपनीचे सीईओ तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या मार्क झुकरबर्ग याने याबाबतची माहिती दिली आहे. तो म्हणाला की,’ या नवीन सुविधेच्या माध्यमातून दुकानदार फेसबुकवर आपले दुकान सेट करू शकतील आणि त्यांच्या स्वत: च्या पध्दतीने वस्तू तिथे दाखवू शकतील. फेसबुक याविषयी म्हणतो की, ‘या उपक्रमाचे उद्दीष्ट लहान तसेच मध्यम स्वरूपाच्या व्यावसायिकांना ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे हे आहे, जेणेकरून सध्याच्या या संकटाच्या परिस्थितीत ते आपले संरक्षण करू शकतील.
Facebook Shops कसे काम करेल – यामध्ये फेसबुक शॉप्सद्वारे एकच ऑनलाइन स्टोअर तयार केले जाईल जे फेसबुक आणि इंस्टाग्राम दोन्ही वर उपलब्ध असेल.
(१) याच्या चेकआउट फीचरद्वारे In -App शॉपिंग करता येईल, तर त्याच्या मेसेजिंग फीचरच्या माध्यमातून ग्राहक या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध व्यापाऱ्यांसह व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम डायरेक्टच्या माध्यमातून चॅट करु शकतील.
(२) मार्क झुकरबर्ग पुढे म्हणाला की, ‘ आम्ही आणखी सात ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मशी जोडून आपल्या प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त व्यापारी आणि प्रोडक्ट्सना एकत्र जोडण्याचा प्रयत्न करीत आहोत.
(३) झुकरबर्ग पुढे म्हणाला की,’ ही दुकानं तुम्ही याचे फेसबुक पेज तसेच इन्स्टाग्राम प्रोफाइल यांवर पाहू शकाल. ते स्टोरीज मधूनही दिसू शकतात किंवा जाहिरातींमधूनही पाहता येऊ शकतील.
(४) व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या वस्तू या दुकानांत दिसून येतील आणि युझर्स या वस्तूंची खरेदी किंवा ऑर्डर देऊ शकतील. फेसबुकने गेल्याच वर्षी फोटो शेअरिंग अॅप ,इन्स्टाग्राम आणि मेसेजिंग अॅप तसेच व्हॉट्स अॅपवर काही मर्यादित शॉपिंग पर्याय दिलेले होते. फेसबुकचा हा नवा उपक्रम त्याला विस्तार देताना दिसत आहे.
(५) कंपनीचा असा विश्वास आहे की यामुळे युझर्सची ग्रोथ कमी झाली असूनही कंपनीचे प्लॅटफॉर्म अधिक व्यवसाय करण्यात अनुकूल असेल आणि यामुळे कंपनीच्या महसुलात आणखी वाढ दिसून येईल.
(६) कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी एका लाइव स्ट्रीमिंगमध्ये म्हटले आहे की,’ या साथीच्या काळात अर्थव्यवस्थेची पुनर्बांधणी सुरू करण्यासाठी ई-कॉमर्सचा विस्तार करणे महत्त्वाचे ठरेल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.