खुशखबर !!! मुलांच्या नावाने ‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक करा अन् टॅक्स वाचवा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । टॅक्सपेअर्स अनेक प्रकारे टॅक्स वाचवू शकतात. टॅक्स वाचवण्यासाठी पालक आपल्या मुलांच्या नावाने गुंतवणूकही करू शकतात. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, सुकन्या समृद्धी योजना, लाईफ इन्शुरन्स आणि काही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केल्याने तुमचा टॅक्स तर वाचेलच मात्र त्याबरोबरच त्यांच्या भविष्यासाठी मोठा फंडही जमा होईल.

PPF (सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी)
PPF मध्ये गुंतवणूक केल्यास टॅक्समध्ये सूट मिळते, तसेच त्यात गुंतवलेले पैसेही सुरक्षित असतात. पालक मुलाच्या नावाने PPF खाते उघडू शकतात. तुम्ही एका आर्थिक वर्षात PPF मध्ये 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. सध्या सरकार PPF वर 7.1 टक्के व्याज देत आहे. पालक आपल्या अल्पवयीन मुलाचे PPF खाते देखील उघडू शकतात. मूल 18 वर्षांचे होईपर्यंत हे खाते पालकांच्या ताब्यात असते. यामध्ये लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा आहे की जर मुलाच्या पालकाचे आधीपासूनच PPF खाते असेल आणि त्याने मुलाच्या नावाने PPF खाते देखील उघडले असेल. तर ते दोन्ही खात्यांमध्ये एका आर्थिक वर्षात फक्त 1.5 लाख रुपयेच गुंतवू शकतील.

पालकांपैकी कोणीही मुलाच्या नावाने PPF खाते उघडू शकतो आणि कलम 80 अंतर्गत टॅक्स सूट मिळवू शकतो. खाते उघडण्यासाठी पासपोर्ट आकाराचा फोटो, वयाचा पुरावा आणि पालकांचे पॅन कार्ड आवश्यक आहे. मूल 18 वर्षांचे झाल्यावर पालकाचे नाव PPF खात्यातून काढून टाकले जाते. प्रौढ मुल स्वतः त्यात गुंतवणूक करू शकतो.

सुकन्या समृद्धी योजना (SSY)
मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजना (SSY) खाते उघडून, पालकाला प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर टॅक्स सवलत देखील मिळू शकते. सध्या सरकार सुकन्या समृद्धी योजनेत 7.6 टक्के दराने व्याज देत आहे. पालक त्यांचे मूल 10 वर्षांचे होण्यापूर्वी सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडू शकतात. मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर किंवा दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर या खात्यातून रक्कम काढता येईल. खाते उघडल्यानंतर 21 वर्षांनी किंवा मुलीच्या लग्नानंतर हे खाते बंद केले जाऊ शकते.

Leave a Comment