खुशखबर ! आता आधार दाखवून लगेच घेता येईल LPG गॅस कनेक्शन, सोबत सबसिडीही मिळेल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर तुम्हाला एलपीजी गॅस कनेक्शन घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. होय .. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) गॅस कंपनी इंडेन ने ग्राहकांसाठी एक मोठी सुविधा जाहीर केली आहे. आता कोणताही ग्राहक फक्त त्याचे आधार कार्ड दाखवून त्वरित LPG कनेक्शन घेऊ शकतो. इंडियन ऑईलने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे ही माहिती दिली आहे. गॅस कनेक्शनसाठी, आधारच्या डिटेल्सशिवाय इतर कोणत्याही डॉक्युमेंट्सची आवश्यकता नाही.

इंडेन काय म्हणाले ते जाणून घ्या?
इंडियन ऑईलने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,” जर एखाद्या व्यक्तीला नवीन एलपीजी कनेक्शन घ्यायचे असेल तर तो आपले आधार दाखवून ते घेऊ शकतो. त्याला सुरुवातीला एलपीजी सबसिडी दिली जाईल. ग्राहक नंतर ऍड्रेस प्रूफ सादर करू शकतो. हे प्रूफ सादर होताच सिलेंडरवरील सबसिडीचा लाभही दिला जाईल. एवढेच नाही, जर एखाद्या ग्राहकाला लवकरच कनेक्शन मिळवायचे असेल आणि त्याच्याकडे ऍड्रेस प्रूफ नसेल, तर तो तत्काळ आधार क्रमांकाद्वारे या सुविधेचा हक्कदार असेल.

ही योजना सर्व प्रकारच्या सिलेंडरवर लागू होईल
आधारशी जोडणी घेण्याची ही योजना सर्व प्रकारच्या सिलेंडरवर लागू होईल. मात्र, यामध्ये कमर्शिअल सिलेंडरचा समावेश करण्यात आलेला नाही. ही योजना 14.2 किलो, 5 किलोच्या सिंगल, डबल किंवा मिक्स्ड सिलेंडर कनेक्शनसाठी आहे. हाच नियम एफटीएल किंवा फ्री ट्रेड एलपीजी सिलेंडर साठीही लागू होतो.

एलपीजी गॅस कनेक्शन कसे मिळवायचे ते जाणून घ्या?
1. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या गॅस एजन्सीकडे जावे लागेल.
2. यानंतर, आता तुम्हाला एलपीजी कनेक्शनचा फॉर्म भरावा लागेल.
3. फॉर्ममध्ये, तुम्हाला आधारचा तपशील द्यावा लागेल, तसेच आधारची एक कॉपी जोडावी लागेल.
4. सेल्फ डिक्लेरेशनसह फॉर्ममध्ये आपल्या घराचा पत्ता सबमिट करा.
5. यानंतर तुम्हाला लगेच LPG कनेक्शन दिले जाईल.
6. मात्र, या कनेक्शनसह तुम्हाला सरकारी सबसिडीचा लाभ मिळणार नाही.
7. तुम्हाला सिलेंडरची संपूर्ण किंमत मोजावी लागेल.
8. जेव्हा तुमचा ऍड्रेस प्रूफ तयार होईल, तेव्हा ते गॅस एजन्सीकडे सबमिट करा.
9. या पुराव्याची पुष्टी केली जाईल, म्हणून गॅस एजन्सी ती व्हॅलिड डॉक्युमेंट्स म्हणून तुमच्या कनेक्शनमध्ये नोंदवेल.
10. यानंतर तुमचे विनाअनुदानित कनेक्शन सबसिडी कनेक्शनमध्ये ट्रान्सफर होईल. मात्र, सिलेंडर घेताना, तुम्हाला संपूर्ण रक्कम जमा करावी लागेल आणि नंतर सरकार तुमच्या बँक खात्यात सबसिडी जमा करेल.

Leave a Comment