खुशखबर! आता इंटरनेटशिवाय RuPay कार्ड द्वारे केले जाईल ट्रान्सझॅक्शन, कसे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । रुपे (RuPay) ने एक खास सेवा आणली आहे. या सुविधेअंतर्गत कार्डधारक इंटरनेटशिवायही पेमेंट करू शकतील. बुधवारी, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) म्हटले आहे की, ते रुपे कॉन्टॅक्टलेस कार्डमध्ये ऑफलाइन पेमेंटसाठी एक नवीन फीचर जोडत आहे. याबाबत प्रायोगिक तत्वावरही काम सुरू झाले आहे. तथापि, ट्रान्सझॅक्शनसाठी त्या क्षेत्रामध्ये पॉईंट ऑफ सेल (POS) असणे आवश्यक आहे. एनपीसीआयने म्हटले आहे की, रीलोडेबल रूपे NCMC कार्डमुळे ग्राहकांना सहजतेने ट्रान्सझॅक्शन करण्याची सुविधा मिळेल.

एनपीसीआयने म्हटले आहे की, त्यांनी रुपे कार्डमध्ये असे फीचर समाविष्ट केले आहे की, ज्यामुळे मर्यादित इंटरनेट उपलब्ध असलेल्या भागातही ऑफलाइन ट्रान्सझॅक्शन करणे शक्य होईल. यासह सोयीस्कर किरकोळ ट्रान्सझॅक्शनसाठी वॉलेटची सुविधादेखील देण्यात आली आहे. एनपीसीआयने म्हटले आहे की, हे रुपे कार्ड धारक मर्यादित नेटवर्क असलेल्या भागात पीओएस वर कॉन्टॅक्टलेस ऑफलाइन पेमेंट करू शकतील.

https://t.co/xV7VE0lDnD?amp=1

सहजपणे पेमेंट केले जाईल
या नवीन फीचरसह, कमी नेटवर्क किंवा अगदी इंटरनेटशिवायही छोटे ट्रान्सझॅक्शन केले जाऊ शकतात. यामध्ये मेट्रोची तिकिटे, बसची तिकिटे, कॅब फेअर आदींचे पेमेंट सामील आहे. त्याची खास गोष्ट म्हणजे ती सामान्य ट्रान्सझॅक्शनपेक्षा खूप वेगाने काम करते. यामध्ये माहिती भरल्यानंतर केवळ ओके करावे लागेल आणि थोड्या वेळात पेमेंट सहजतेने पूर्ण केले जाईल.

https://t.co/2Eo4kFEHiU?amp=1

ऑनलाइन पेमेंट मोड पेक्षा वेगळे आहे
एनपीसीआयचे प्रमुख नलिन बन्सल म्हणाले की, आमचा विश्वास आहे की, यामुळे कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या स्वप्नाला मदत होईल. रुपे कॉन्टॅक्टलेस ऑफलाइन फीचरद्वारे देशातील डिजिटल पेमेंट अधिक मजबूत केले जातील. रिझर्व्ह बँकेने (RBI) काही दिवसांपूर्वी अशा सेवेस मंजुरी दिली होती. ही सुविधा केवळ छोट्या पेमेंटसाठी असेल. हे पेमेंट ऑनलाइन पेमेंट मोडपेक्षा वेगळे आहे. यासाठी कार्डधारकाला स्वतंत्र वॉलेटची आवश्यकता आहे, ज्याची सुविधा आता रुपे कार्ड धारकांनाही उपलब्ध आहे.

https://t.co/XKGXE1eHZr?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment