युझर्सच्या तक्रारीनंतर Google ने ऑगस्टमध्ये 95 हजारांहून अधिक कन्टेन्ट काढून टाकले, रिपोर्ट जारी केला

Google
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । टेक्नोलॉजीच्या क्षेत्रातील दिग्गज गुगलने मंगळवारी जारी केलेल्या आपल्या मासिक पारदर्शकता रिपोर्टमध्ये म्हटले आहे की,” जुलैमध्ये त्यांना युझर्स कडून 36,934 तक्रारी आल्या आणि या तक्रारींवर आधारित 95,680 कन्टेन्ट काढून टाकले. युझर्सच्या तक्रारींशिवाय Google ने स्वयंचलित शोधाच्या आधारावर जुलैमध्ये 5,76,892 कन्टेन्ट काढून टाकले. अमेरिकन कंपनीने ही माहिती भारताच्या आयटी नियमांच्या अनुपालनाखाली दिली, जे 26 मे रोजी लागू झाले.

या तंत्रज्ञान कंपनीने म्हटले आहे की,” जुलैमध्ये भारतातील वैयक्तिक युझर्स कडून त्यांना 36,934 तक्रारी मिळाल्या आणि या तक्रारींवर आधारित कन्टेन्ट काढण्याच्या क्रियांची संख्या 95,680 होती, जी आतापर्यंतची सर्वाधिक आहे.

याआधी जूनमध्ये गुगलकडे 36,265 तक्रारी आल्या होत्या आणि त्या आधारावर 83,613 कन्टेन्ट काढून टाकण्यात आले होते. एप्रिलमध्ये 59,350 कन्टेन्ट आणि मे महिन्यात 71,132 कन्टेन्ट काढून टाकण्यात आले.

कोणाशी संबंधित तक्रारी होत्या …
कंपनीने म्हटले आहे की,” यातील काही तक्रारी बौद्धिक संपदा हक्कांच्या उल्लंघनाशी संबंधित होत्या, तर काहींनी बदनामीसारख्या कारणावरून कन्टेन्ट काढून टाकण्यास सांगितले.

गुगलने म्हटले की,”जेव्हा आम्हाला आमच्या प्लॅटफॉर्मवर कन्टेन्ट बद्दल तक्रारी मिळतात, तेव्हा आम्ही त्यांचे काळजीपूर्वक मूल्यांकन करतो.” दरम्यान, कॉपीराइट (94,862), ट्रेडमार्क (807), न्यायालयाचा आदेश (4) सह इतर कायदेशीर श्रेणींमधील कन्टेन्ट हटवले गेले.