जनाब संजय राऊत, माझ्यासारख सुरक्षा नसताना महाराष्ट्र फिरून दाखवा; पडळकरांचे आव्हान

0
48
raut padalkar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. त्याच दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींना मोदी सरकारने वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राउताना प्रत्युत्तर दिले आहे.

जनाब राऊत तुम्ही वाय सुरक्षेबाबत लेख लिहता, पण माझे तुम्हाला खुले आव्हान आहे की, माझ्यासारखी कुठलीही सुरक्षा न स्वीकारता महाराष्ट्रात फिरवून दाखवा, असे चॅलेंजच पडळकर यांनी राऊतांना दिले आहे. तसेच, तेव्हाच शेतकऱ्यांचं तुमच्यावरती किती प्रेम आहे, याची तुम्हाला खरी प्रचिती येईल, असेही पडळकर म्हणाले.

जेंव्हा लाल चौकात पाक आंतकवाद्यांनी, कोई माँ का लाल तिरंगा लहराके दिखाये, अशा धमक्यांचे पोस्टर्स लावले होते. त्यावेळेस, नरेंद्र मोदींनींच या धमक्यांना न जुमनता लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवला होता, अशी आठवण सांगितली. तसेच, राज्यात उर्जामंत्र्यांच्या आश्वासनानंतर सुद्धा शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतोय, यावर कधीतरी एखादा लेख लिहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here