हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते गोपीचंद पडळकर गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केल्यामुळे चर्चेत आहेत. आता तर पडळकरांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले आहे. जेजुरी येथील आहिल्याबाई होळकर पुतळ्याचे जसे अनावरण केले होते तसाच प्रयोग औंढा नागनाथ (aundha nagnath) इथं करणार असल्याचे पडळकर यांनी जाहीर केले आहे.
येत्या 16 मार्च रोजी औंढा नागनाथ इथं आहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. परंतु औंढा नागनाथ येथील आहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण आम्ही करणार आहोत. गेल्या वर्षभरापासून मुख्यमंत्र्यांना यासाठी वेळ नाही. माझं कुटुंब माझी जबाबदार यातून मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. त्यामुळे सर्व समाजाच्या वतीने येत्या 16 तारखेला औंढा नागनाथ येथील आहिल्याबाईंच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहोत,” असे पडळकर यांनी म्हटलंय.
मागील महिन्यात जेजुरी इथं आहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्याचे नियोजित करण्यात आले होते. पण त्याआधीच गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या समर्थकांनी पहाटे जाऊन पुतळ्याचे अनावर केले होते. त्यामुळे राज्यात एकच राजकीय वाद उफाळून आला होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’