हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्यानंतर पडळकर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. आज दगडं फेकून मारले आहेत, उद्या गोळ्या घालतील. पण तरी मी माझी भूमिका मांडणं सोडणार नाही,’ अशी गर्जना गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. दगडफेकीनंतर आज सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला लक्ष्य केलं.
मी शरद पवारांवर काय टीका केली होती. मग मी बोललेलं इतकं वाईट वाटत असेल तर तुम्ही मोदींवर का बोलता?”, असा प्रतिप्रश्न पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना केला. माझा आवाज कोणी दाबू शकत नाही. बहुजनांना जागं करण्याचा माझा प्रयत्न आहे, असं पडळकर म्हणाले.
पडळकर म्हणाले, मी गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात जे गोरगरिबांच्या बाजूने बोलत आहे. गोरगरिबांची बाजू मांडत आहे. ते या लोकांना आवडली नसेल. ते जे गप्पा मारत आहेत लोकशाहीच्या, फुले-शाहू-आंबेडकरांच्या, त्यांचं हेच उत्तर आहे का? असा सवाल करत वैचारिक लढाई तर विचाराने चाला. पण अशाप्रकारे उत्तर देणार असतील तर मी कधी गप्प बसणार नाही असे पडळकर यांनी म्हंटल.