आगरकरांच्या जयंतीला टिळकांचा फोटो, गोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली । आज गोपाळ गणेश आगरकर यांची जयंती आहे.  महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक होत. लोकमान्य टिळक आणि गोपाळगणेश आगरकर हे एकेकाळचे चांगले स्नेही होते. त्यामुळे टिळक आगरकर हे महाराष्ट्राला चांगलेच परिचित आहेत. आज गोपाळ गणेश आगरकरांच्या जयंतीच्या दिवशी चर्चा होते आहे ती भाजपाच्या गोपीचंद पडळकरांची  त्याचे कारणही असेच आहे. गोपीचंद पडळकर यांनी गोपाळ गणेश आगकरांना आदरांजली वाहिली मात्र फोटो टिळकांचा लावला.

गोपीचंद पडळकर यांची या आदरांजली मुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. गोपीचंद पडळकर यांनी बारामतीतून अजित पवार यांच्याविरोधात २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते चर्चेत आले होते.

शरद पवार आणि करोना यावरुन त्यांनी अत्यंत अशोभनीय वक्तव्य केले होते. यावरुन त्यांच्यावर चांगलीच टीकाही झाली होती. काही दिवसांपूर्वी एका वक्तव्यामुळे चर्चेत असलेले गोपीचंद पडळकर हे आता चुकीचा फोटो पोस्ट केल्याने पु्न्हा चर्चेत आले आहेत. टिळक आणि आगरकर यांच्यातला फरकही समजत नाही, चुकीचे फोटो लावणारे नेते या आणि अशा प्रकारच्या कमेंट्स देत नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे.

Leave a Comment