सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे
गेल्या दोन महिन्यांपासून अज्ञातवासात गेलेल्या गोपीचंद पडळकर यांनी अखेर वंचित बहुजन आघाडी मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आज सांगली मध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. तसेच वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर हे निष्कलंक आणि चारित्र्यवान नेते असल्याचंही जाता जाता त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान गोपीचंद पडळकर यांच्या राजीनाम्यामुळे जिल्ह्यात विधानसभा निवडणुक मोठी रंजक होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडी तर्फे सांगली मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. वंचितच्या उमेदवारां मध्ये राज्यात विक्रमी मतदान त्यांना पडलं होतं. लोकसभा निवडणुकीनंतर पडळकर यांनी वंचित पासून फारकत घेत पक्षापासून दूर राहण्याचच पसंत केलं होतं. आज पडळकर यांनी याबाबत अधिकृत भूमिका जाहीर करत त्यांनी भाजपवर स्तुती सुमन उधळली आहेत. प्रकाश आंबेडकर हे निष्कलंक चारित्रावन नेतृत्व आहे. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर कार्यकर्त्यांशी केलेल्या चर्चे मुळे वंचित आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असे सांगत लोकांचा दबाव असल्याने राजीनामा देत आहे. आज पासून वंचित बहुजन आघाडी आणि माझा कसलाही संबंध नाही असे जाहीर केले. पडळकरांच्या, भाजप संपर्कामुळे, वंचित बहुजन आघाडीच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झालेल आहे.
भाजपा आणि शिवसेना युतीच्या निर्णया नंतर पडळकर यांच्या भाजपा प्रवेशा बाबत निंर्णय होणार आहे. भाजपाचा गड असणाऱ्या जत मध्ये सध्या विध्यमान आमदार विलासराव जगताप याना स्थानिक भाजपा नेत्यांचा विरोध आहे, शिवाय येथील धनगर समाजाची संख्या ज्यास्त असल्याने, पडळकर यांच्या नावाचा पर्याय पुढे आला आहे. पडळकर यांची मते युती किंव्हा आघाडी या पैकी कुणाकडे जातील त्यांचं पारडं जड होणार आहे, त्यामुळे पडळकर याना भाजपा मध्ये घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजप मध्ये प्रवेश घेण्या संदर्भात येत्या दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले आहे.