हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या प्रचारा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार टोलेबाजी करत विरोधकांवर निशाणा साधला. ज्याला स्वतःचे डिपॉझिट वाचवता आले नाही तो तुम्हाला सल्ले देतोय असे म्हणत अजितदादांनी पडळकर यांच्यावर टीका केली. त्यावर पडळकर यांनी पलटवार केला आहे.
अजित पवार यांच्यावर टीका करत त्यांचं बोलणं टग्यासारखं आहे आणि रडणं बाईसारखं आहे अशा शब्दात मंगळवेढा येथे आयोजित एका सभेत पडळकर यांनी सडकून टीका केली आहे. तुमच्यामागे चुलता असल्याची कबुली तुम्ही देता याचाच अर्थ तुमचे कर्तृत्व शून्य आहे, असा टोलाही पडळकर यांनी लगावला. अजित पवार यांचं सगळं चुलत्यावर अवलंबून आहे तर भाजपच्या मागे राज्यातील गोरगरीब अठरा पगड जाती उभ्या आहेत, असे पडळकर म्हणाले.
अजित पवार नक्की काय म्हणाले –
सध्या एक नेता तुमच्याकडे जोरदार भाषणे करीत फिरतोय, त्याचे डिपॉझिट सुद्धा त्याला बारामतीमध्ये वाचवता आले नव्हते आणि आता हा कोणाच्या तोंडाने मते मागतोय. ज्याला स्वतःचे डिपॉझिट वाचवता आले नाही तो तुम्हाला सल्ले देतोय असे म्हणत अजित पवारांनी धनगर नेते आमदार गोपीचंद पडळकर यांची खिल्ली उडवली होती.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page
Click Here to Join Our WhatsApp Group