…नाहीतर मंत्र्यांना गावात फिरु देणार नाही ; गोपीचंद पडळकरांचा सरकारला इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मागासवर्गीय पदोन्नतीबाबत सरकारचं धोरण चुकीचं असून सरकार जाणीवपूर्वक ओबीसींवर अन्याय करतंय असा आरोप भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. तसेच मंत्रीगट समितीचे अध्यक्ष असलेल्या अजित पवारांनी ओबीसींसाठी काय केलं हे त्यांनी सांगावं, एकच बैठक घेऊन थेट निर्णय जाहीर केल्याचा फटका समाजातील दीड लाख लोकांना बसलाय. सरकारने हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा नाहीतर मंत्र्यांना गावात फिरु देणार नाही”, असा इशारा भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या एका समितीनं मिटींग घेतली. 18 फेब्रुवारीला शासन आदेश काढत आरक्षणाचा कसलाही विचार न करता 100 टक्के जागा भरल्या जातील, असं सरकारने म्हटलं. या आघाडी सरकारने मागासवर्गीयांच्या जागा दुसऱ्यांना दिल्या. ह्या सरकारचा जाहीर निषेध करुन हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा नाहीतर मंत्र्यांना गावात फिरु देणार नाही, असं पडळकर म्हणाले.

राज्य सरकारच्या गलथान कारभाराचा फटका मागासवर्गीय समाजाला बसतोय. समाजाचं मानसिक खच्चीकरण केलं जात आहे. ही मागासवर्गीय समाजाची मोठी फसवणूक आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांना पुढं करून हे महाविकास आघाडीचे नेते SC,ST, OBC समाजाचं मानसिक खच्चीकरण करत आहेत, असा आरोप पडळकर यांनी केला.

Leave a Comment