हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बैलगाडी शर्यतीवर न्यायालयाची बंदी असतानाही आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी पोलिसांना गुंगारा देत शुक्रवारी पहाटे आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथे बैलगाडी शर्यत पार पाडली. यानंतर पडळकरांनी इशारा दिला आहे. “सरकारने बैलगाडी शर्यतीबाबत तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा बैलगाडीसह विधान भवनावर मोर्चा काढणार असल्याचे पडळकरांनी म्हंटले आहे.
आटपाटी तालुक्यातील झरे या गावी बैलगाडा शर्यत घेणार असल्याचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी सरकारला आव्हान दिले होते. ही शर्य होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनही सज्ज झाले होते. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ नये म्हणून पोलिसांनी कटेकोट बंदोबस्त तैनात केला होता. मात्र, पोलिसांना चकवा देत पडळकरांनी रातोरात दुसऱ्या जागेवर मैदान तयार करत शर्यत भरवली आहे. यानंतर त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला असून त्यांनी आता पुढचा मोर्चा हा विधान भवनावर काढणार असल्याची घोषणा केली आहे.
दरम्यान’ पडळकरांच्या या घोषणेनंतर आणि आटपाटी तालुक्यातील झरे या गावी बैलगाडा शर्यत भरविल्याप्रकरणी स्थानिक प्रशासनाकडून आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.