हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाड येथील तळीये गावात पावसामुळे दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. तब्बल 40 पेक्षा अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तळीये गावात जाऊन दरडग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी काळजी करू नका, सर्वांना मदत मिळेल अस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, अनपेक्षितपणे या दुर्घटना घडत आहेत. काळजी करु नका, सरकार मदत करेल. जरी कागदपत्रं गहाण झालं असेल तर त्याचा विचार करु नका,ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई हि सरकार कडून देण्यात येईल असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिल. तसेच इथून पुढे अशा घटना घडू नये यासाठी आपण व्यवस्थापन करू असेही त्यांनी म्हंटल
आजकाल पावसाळ्याची सुरुवातही चक्रीवादळाने होते. अशा घटना पाहता डोंगर- उतार व कडे-कपाऱ्यांतील वाड्या-वस्त्यांचे स्थलांतर करण्याचे नियोजन करण्यात येईल. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाळ्यात नद्यांचे पाणी वाढून पूर परिस्थिती उद्भवते. यासंदर्भात मार्ग काढण्यासाठी जल आराखडा तयार केला जाईल.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 24, 2021
पावसाळ्यात अनपेक्षित घटना घडत आहे. त्यामुळे त्यातून शहाणे होण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षापासून चक्रीवादळानेच पावसाळा सुरू होत असल्याचं दिसून येत आहे. अनेक वस्त्या डोंगरदऱ्यात आहेत. त्यांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे. आम्ही फक्त पुनर्वसनाचा विचार करणार नाही. तर त्याचा आराखडा तयार करणार आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं