हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजारात गुंतवणूक करताना अनेक गुंतवणूकदारांकडून मल्टीबॅगर स्टॉकचा शोध घेतला जातो. प्रत्येकालाच एका वर्षात हजारो टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न मिळावा असे वाटतं असते. मात्र बहुतेक मल्टीबॅगर स्टॉक्स हे पेनी स्टॉक्स हे देखील लक्षात असू द्यात. यामध्ये नफा मिळो वा ना मिळो, पण जोखीम मात्र भरपूर असते. त्यामुळे अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याआधी एखाद्या सल्लागाराकडून सल्ला घेणेच कधीही चांगले ठरेल.

हे लक्षात घ्या कि, बाजारातील तज्ञ नेहमीच डिव्हीडंड देणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. एक तर अशा शेअर्समध्ये जोखीम कमी असते. याशिवाय याद्वारे अनेकदा ‘दुप्पट नफा’ देखील कमावता येतो. कारण यामध्ये एकीकडे शेअर्सची किंमत वाढल्यामुळे भरपूर रिटर्न मिळतो. तर दुसरीकडे, चांगला डिव्हीडंड देखील मिळतो. Multibagger Stock

तर आज आपण सरकारी कंपनी असलेल्या पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (PFC) बाबतची माहिती जाणून घेणार आहोत. गेल्या वर्षी एप्रिलच्या सुरुवातीला 121 रुपये किंमत असलेले हे शेअर्स सध्या 156 रुपयांच्या पातळीवर आहेत. म्हणजेच या कालावधीत त्याने 28 टक्के रिटर्न दिला आहे. Multibagger Stock

जर एखाद्याने वर्षभरापूर्वी यामध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्यांना 1.28 लाख रुपयांचा रिटर्न मिळाला असता. गेल्या काही महिन्यांत शेअर बाजार अत्यंत खराब अस्वस्थेत असताना हा रिटर्न मिळाला आहे. याची खास बाब अशी कि, यामध्ये शेअर्सच्या समान संख्येप्रमाणे डिव्हीडंड देखील मिळेल. Multibagger Stock

पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने गेल्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 10 रुपयांचा डिव्हीडंड दिला आहे. आतापर्यन्त कंपनीकडून गुंतवणूकदारांना 4 वेळा डिव्हीडंड देण्यात आला आहे. यामध्ये 9 जून 2022 रोजी पहिल्यांदा 1.25 रुपये, 1 सप्टेंबर 2022 रोजी 2.25 रुपये, 24 नोव्हेंबर 2022 रोजी 3 रुपये तर 24 फेब्रुवारीमध्ये 3.50 रुपये डिव्हीडंड देण्यात आला आहे. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nseindia.com/get-quotes/equity?symbol=PFC
हे पण वाचा :
Mahindra Thar वर मिळवा 40,000 पर्यंतची सूट, ‘या’ वाहनांवरही सवलत उपलब्ध
Royal Enfield ची इलेक्ट्रिक मोटरसायकल लवकरच होणार लाँच; पहा लूक
Exoplanet : पृथ्वीच्या-आकाराच्या ‘या’ ग्रहाकडून वैज्ञानिकांना मिळाले रहस्यमयी रेडिओ सिग्नल
Tinder वरील मुलीच्या प्रेमात पडलेल्या व्यक्तीच्या खात्यातून गायब झाले तब्ब्ल 14 कोटी रुपये
Murder : चिकन करी वरून बाप-लेकात जुंपली; पित्याकडून मुलाचा खून




