औरंगाबाद – राज्याचा गाडा जिथून चालवला जातो आणि सर्वसामान्यांची तपासणी केल्याशिवाय, तसेच पासशिवाय आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. त्याच मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच सापडल्याची धक्कादायक बातमी ताजी असतानाच, आता औरंगाबाद शहराचा गाडा जिथून चालवला जातो त्या महानगरपालिका कार्यालयातील स्वच्छतागृहात देशी-विदेशी दारूच्या बाटल्यांचा खच असल्याचा खळबळजनक प्रकार आज दुपारच्या सुमारास उघडकीस आला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये सरकारी कार्यालये आहेत की मद्यालये अशी चर्चा रंगत आहे.
एकीकडे सरकारी कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना पास शिवाय तसेच तपासणी केल्याशिवाय आत मध्ये प्रवेश दिला जात नाही. मात्र दुसरीकडे त्याच सरकारी कार्यालयांमध्ये दारूच्या बाटल्यांचा मोठ्या प्रमाणावर खरच आढळून आला आहे. यामुळे या देशी दारूच्या बाटल्या संबंधित कार्यालयात कोणाच्या मार्फत नेण्यात आल्या ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे सरकारी कार्यालयांमध्ये काम असल्यास नागरिकांना अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागते. तसेच ज्या कार्यालयांमधून संबंधित शहराचा गाडा हाकला जातो त्याच्या कार्यालयात दारूच्या बाटल्या सापडणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. यामुळे कार्यालयात ओल्या पार्ट्या होतात की काय ? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.जर ओल्या पार्ट्या होत असतील तर त्या कोणाच्या आशीर्वादाने होत आहेत ? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. एकंदरीतच मनपा कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सऱ्हासपणे दुर्लक्ष असल्याचे या सर्व प्रकरणावरून सिद्ध होत आहे.
नागरिकांनी करायचे काय ?
याप्रमाणे सरकारी कार्यालये जर जर दारुचा अड्डा बनत जात असतील तर सर्वसामान्य नागरिकांना नेमके करावे काय ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित होत आहे. एकंदरीतच या सर्व धक्कादायक प्रकणामुळे प्रशासनाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.