Government Saving Schemes | या 10 सरकारी गुंतवणूक योजना तुम्हाला बनवतील श्रीमंत, पैशाच्या सुरक्षिततेचीही हमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Government Saving Schemes | आजकाल प्रत्येकजण भविष्यासाठी चांगली गुंतवणूक करत असतात. आणि त्यासाठी तेही गुंतवणुकीचा चांगला पर्याय देखील शोधत असतात. अशा लोकांसाठी सरकारच्या अनेक बचत योजना आहेत. ज्यामध्ये तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक करू शकता. आणि त्याचा परतावा देखील तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मिळतो. आता आपण या सरकारी काही योजना पाहणार आहोत. ज्यामधून तुम्ही मला खूप चांगला परतावा मिळेल तर आता आपण सरकारच्या दहा बचत योजना बद्दल माहिती जाणून घेऊया.

राष्ट्रीय बचत योजना

सरकारच्या या योजनेत किमान 1000 रुपये ठेव करता येते. या खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये आणि जॉईन खात्यामध्ये जास्तीत जास्त 15लाख रुपये लाख रुपये ठेवता येतात. ही योजना पंधरा वर्षात पूर्ण होते आणि एक वर्षानंतर या योजनेतून तुम्हाला पैसे काढता येतात. जर ही मुदत संपायच्या आधीच तुम्ही 3 वर्ष पैसे काढले तर तुम्हाला 2 टक्के कपात होते.

राष्ट्रीय बचत वेळ ठेव रक्कम

या योजनेत एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्षे, आणि चार वर्षे मुदत ठेव श्रेणी उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला किमान ठेव रक्कम 100 रुपये आहे. त्यानंतर 100 च्या पटीत देखील ही रक्कम तुम्हाला ठेवता येते. या ठेवीवर मर्यादा नाही या योजनेत 5 वर्षाच्या ठेवीवर आयकर कायदा 1961 अंतर्गत कर सुट आहे. एका वर्षाच्या ठेवीवर 6.9 टक्के व्याजदर 2 वर्षाचे ठेवीवर 7 टक्के व्याजदर 3 वर्षांच्या ठेवीवर 7.10 टक्के व्याजदर मिळते.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना | Government Saving Schemes

या योजनेची किमान 1000 रुपये आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त 30 लाख रुपये देखील जमा करू शकता. या योजनेत खाते उघडणाऱ्या व्यक्तीचे वय हे साठ वर्षे किंवा 60 वर्षापेक्षा जास्त असावे. सेवानिवृत्ती घेणारी कोणती व्यक्ती त्यात जमा करू शकते. या योजनेत ठेवींना कलम 80c अंतर्गत करातून सूट देण्यात आलेली आहे. यावर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान व्याजदर 8. 20 टक्के असणार आहे.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र

या योजनेत किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यानंतर 100 रुपयांच्या पटीत जास्त गुंतवणूक करता येते. ही योजना 5 वर्षात पूर्ण होते या कमाल ठेवीसाठी कोणतीही मर्यादा नाही नॅशनल सेविंग सर्टिफिकेट बँकेकडे तारण म्हणून देखील कर्ज घेता येते.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी

सरकारी बचत योजनामध्ये ही सगळ्यात लोकप्रिय असलेली योजना आहे. हे खाते किमान 500 रुपयांच्या ठेवीस तुम्हाला उघडता येते. या खात्यात तुम्हाला एका वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये ठेवता येतात. योजनेतील गुंतवणूक आयकर कायदा 1961 च्या कलम अंतर्गत कर्ममुक्त योजना आहे.

सुकन्या समृद्धी योजना

पालक त्यांच्या 1 किंवा 2 मुलींसाठी या योजनेमध्ये खाते उघडू शकतात. यामध्ये एका वर्षात किमान 250 रुपये जमा करावे लागतात. तर एका वर्षात 1.5 रुपये या मध्ये तुम्ही ठेवू शकता. हे दहा वर्षापर्यंतच्या मुलींसाठी उघडता येते. मुलगी 21 वर्षाची झाल्यावर ती ही योजना पूर्ण होते.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र

ही योजना महिलांसाठी आहे. यामध्ये मुलगी आणि महिलेच्या नावावर 3 लाखापर्यंत ठेवता येते ही योजना दोन वर्षासाठी असते यावरील व्याजदर 7.5 टक्के एवढे आहे.

किसान विकास पत्र

या योजनेत किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्यानंतर 1000 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येते. याच्या कमाल ठेवीसाठी कोणतीही मर्यादा नाही हे प्रमाणपत्र एका पोस्ट ऑफिस मधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये हस्तांतरित केली जाऊ शकते.

आवर्ती ठेव योजना

ही योजना 100 रुपये किमान ठेवण्यास परवानगी देते ही योजना प5 वर्षात पूर्ण होते. खाते उघडल्यानंतर एका वर्षात 50 टक्के शिल्लक काढता येते l. ही योजना तीन वर्षांनी बंद होऊ शकते 5 वर्षाच्या आरडीवर वार्षिक 6.7 टक्के व्याजदर आहे.

पोस्ट ऑफिस बचत खाते

या योजनेत किमान 500 रुपये तुम्ही गुंतवणूक केली करू शकता. कमाल ठेवीवर कोणतीही निश्चित माहिती ठेवण्यात आलेली नाहीये. यामध्ये वैयक्तिक किंवा संयुक्त खाते देखील उघडता येतो या योजनेचा व्याजदर 4% आहे. इतर योजनांच्या व्याजदरापेक्षा या योजनेचे व्याजदर खूपच कमी आहे.