सरकारने ‘या’ ठिकाणांहून ताब्यात घेतले 11 हजार किलो सोने, ज्यांचे मूल्य आहे 3000 कोटी रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी 11 हजार किलोपेक्षा जास्त (Gold Smuggling) सोने पकडले गेले आहे. अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या अहवालातून हा मोठा खुलासा झाला आहे. या पकडलेल्या सोन्याचे मूल्य 3 हजार कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. हे सोने विमानातळावर (Aiports) च्या तपासणी दरम्यान पकडले गेले. अहवालानुसार हे सोने गेल्या 5 वर्षात बहुतेक बड्या विमानातळावर पकडले गेले आहे. हे सोने 17 हजाराहून अधिक प्रकरणांत पकडले गेले आहे. अहवालानुसार, यामध्ये बंदर आणि रस्ता तपासणी दरम्यान जप्त करण्यात आलेल्या सोन्याचा समावेश नाही.

… जेव्हा एका वेळी 30 किलो सोनं पकडलं गेलं तेव्हा
जुलै 2020 मध्ये कस्टम डिपार्टमेंटला एका डिप्लोमॅटच्या नावावर बुक केलेल्या एका बॅगमध्ये सोन्याची तस्करी केली जात असल्याची आणि त भारतात आणले जात असल्याची माहिती मिळाली. विभागाने तातडीने परराष्ट्र मंत्रालयाला याची माहिती दिली. मंत्रालयानेही कारवाई केली आणि कस्टम विभागाला चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, या बॅगेची झडती घेतली असता त्यात 30 किलोपेक्षा जास्त सोन्याचे सामान बाहेर आले. एनआयएनेही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 16 लोकांना अटक करण्यात आली आहे.

या विमानतळांवर पकडलं जातं सर्वाधिक सोनं
वेगवेगळ्या एजन्सींच्या कारवाईत देशामध्ये सोनं पकडलं जातं. परंतु देशात अशी 10 मोठी विमानतळ देखील आहेत जिथे सर्वाधिक तस्करीचे सोने पकडले जाते. हे 10 विमानतळ, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, इंदिरा गांधी, अण्णा, कॅलिकट, कोचीन, नेताजी सुभाषचंद्र बोस, राजीव गांधी, केम्पेगौडा आणि त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.