हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी देशातील तिसऱ्या टप्प्यासाठी १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार असल्याची घोषणा केंद्र सरकार कडून करण्यात आली आहे. अनेक राज्यांनी कोरोना लस मोफत मिळेल, असे जाहीर केले आहे. अशातच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी संपूर्ण देशवासीयांना कोरोनाची लस मोफत मिळावी, अशी मागणी केली आहे.
याबाबत राहुल गांधी यांनी ट्विट केलं असून चर्चा खूप झाल्या, देशवासीयांना कोरोना लस मोफत मिळायला हवी. विषय संपला. असे राहुल गांधी यांनी म्हंटल. तसेच भारताला भाजपच्या यंत्रणेची शिकार होऊ देऊ नका, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
चर्चा बहुत हो चुकी।
देशवासियों को वैक्सीन मुफ़्त मिलनी चाहिए- बात ख़त्म।
मत बनाओ भारत को भाजपा system का victim!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 26, 2021
दरम्यान यापूर्वी राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं की काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी सर्व राजकीय कामे बाजूला ठेवावीत आणि जनतेला मदत करावी. कोणत्याही परिस्थितीत देशातील जनतेची दु:ख दूर करा. हाच काँग्रेसचा धर्म आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.