हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वीज सतत महाग होत आहे, ज्याचा थेट परिणाम लोकांच्या घरगुती बजेटवर होत आहे. मात्र, आता वीज बिल कमी करणे फारसे कठीण नाही. यासाठी आपल्याला आपल्या छतावर सोलर पॅनेल्स बसवावे लागतील. आपण हे सोलर पॅनेल कोठेही इन्स्टॉल करू शकता. आपल्याला हवे असल्यास, आपण आपल्या छतावरही सोलर पॅनेल बसवू शकता आणि वीज तयार करून ग्रीडला सप्लाय करू शकता. केंद्र सरकार न्यू एंड रिन्यूएबल एनर्जी मंत्रालय रूफटॉप सोलर प्लांट वापरणाऱ्यांना 30% अनुदान देते. या अनुदानाशिवाय हे रूफटॉप सोलर पॅनेल बसविण्यासाठी सुमारे 1 लाख रुपये इतका खर्च येतो.
या प्रक्रियेचा हेतू काय आहे या संपूर्ण प्रक्रियेबद्दल आणि त्यापासून मिळणाऱ्या फायद्यांविषयी माहिती घेउयात.
सर्वप्रथम आपण याच्यावर होणाऱ्या खर्चाबद्दल बोलूयात-
एका सोलर पॅनेलची किंमत सुमारे एक लाख रुपये आहे. हा खर्च प्रत्येक राज्यानुसार वेगळा असतो. परंतु शासनाच्या अनुदानानंतर केवळ 60 ते 70 हजार रुपयांमध्ये एक किलोवॅटचा सौर प्रकल्प इन्स्टॉल केला जातो. काही राज्ये यासाठी अतिरिक्त अनुदान देखील देतात. जर सोलर पावर प्लांट उभारण्यासाठी एकरकमी 60 हजार रुपये नसतील तर आपण कोणत्याही बँकेकडून गृह कर्ज देखील घेऊ शकता. अर्थ मंत्रालयाने सर्व बँकांना यासाठी गृहकर्ज देण्यास सांगितले आहे.
हा झाला खर्च, आता आपण याच्या फायद्यांबद्दल बोलूयात –
एक सोलर पॅनेल 25 वर्षे टिकतो. आपण आपल्या छतावर हे पॅनेल सहज इन्स्टॉल करू शकता तसेच या पॅनेलमधून मिळणारी वीज ही विनामूल्य असेल. तसेच उर्वरित वीजदेखील ग्रीडमार्फत सरकार किंवा कंपनीला विकली जाऊ शकते. म्हणजे मोफत विजेबरोबरच कमाईही होईल. जर आपण आपल्या घराच्या छतावर दोन किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनेल इन्स्टॉल केले असेल तर दिवसा 10 तास सूर्यप्रकाशाच्या स्थितित सुमारे 10 युनिट वीज निर्मिती होईल. जर आपण एका महिन्याचा हिशोब केला तर दोन किलोवॅट सोलर पॅनेलद्वारे सुमारे 300 युनिट वीज निर्मिती होईल.
याप्रमाणे सोलर पॅनेल खरेदी करा
सोलर पॅनेल खरेदी करण्यासाठी आपण राज्य सरकारच्या रिन्यूएबल एनर्जी डेवलपमेंट अथॉरिटीशी संपर्क साधू शकता.
ज्यासाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये कार्यालये तयार केली गेली आहेत.
प्रत्येक शहरात खासगी डीलर्सकडे सोलर पॅनेल्सही उपलब्ध आहेत.
याच्या अनुदानासाठी फॉर्म देखील प्राधिकरण कार्यालयातून उपलब्ध असतील.
कर्ज घेण्यासाठी आधी प्राधिकरणाशी संपर्क साधावा लागेल.
मेंटनेंसचा कोणताही खर्च नाही
सोलर पॅनेलमध्ये मेंटनेंसच्या खर्चाचे टेन्शन नसते. पण त्याची बॅटरी दर 10 वर्षांनी एकदा बदलावी लागेल. याची किंमत सुमारे 20 हजार रुपये आहे. हे सोलर पॅनेल एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी अगदी सहजपणे हलविले जाऊ शकते.
500 वॅट्स पर्यंतचे सोलर पॅनेल उपलब्ध आहेत
पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने सरकारने हा उपक्रम सुरू केला होता. आवश्यकतेनुसार 500 वॅट्स क्षमतेचे सोलर पावर पॅनेल बसविले जाऊ शकतात. त्याअंतर्गत पाचशे वॅट्सच्या अशा प्रत्येक पॅनेलची किंमत 50 हजार रुपयांपर्यंत असेल. हे प्लांट एक किलोवॅटपासून पाच किलोवॅट क्षमतेपर्यंत इन्स्टॉल केले जाऊ शकते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठीआम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.