हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्य समस्या उद्भवू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहे. तसेच, हवेतील धूलीकण वाढल्यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. इतकेच नव्हे तर, यंदाच्या दिवाळीत नागरिकांनी फटाके वाजवू नये, असे आदेश आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत. सध्याच्या स्थितीला मुंबईत प्रदूषणाचा धोका निर्माण झाल्यामुळे सरकारी याबाबत खबरदारी घेताना दिसत आहे.
मुंबई शहरामध्ये प्रदूषणाची पातळी वाढल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच राज्य सरकारकडून महत्त्वाचे निर्देश जारी करण्यात आले आहे. या निर्देशांचे नागरिकांनी पालन करावे आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे देखील सरकारकडून सांगण्यात आले आहे.
सरकारचे नागरिकांना आवाहन
1) नागरिकांनी घराच्या बाहेर वावरताना मास्कचा वापर करावा.
2) मॉर्निंग वॉक आणि संध्याकाळी बाहेर फेरफटका मारणे टाळा.
3) सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी खिडक्या दरवाजे उघडे ठेवू नका.
4) कामानिमित्त दुपारी 12 ते 4 दरम्यान बाहेर पडा
5) लाकूड, कोळसा आणि अन्य जलनशीर गोष्टी जाऊ नका.
6) दिवाळीमध्ये फटाके फोडणे टाळा.
दरम्यान, सध्या मुंबईमधील प्रदूषणाची पातळी वाढत चालल्यामुळे नागरिकांना आपल्या तब्येतीची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर लहान मुले प्रौढ व्यक्ती यांची तब्येत देखील जपावी लागणार आहे. मुंबईमध्ये प्रदूषण वाढत चालल्यामुळे अनेक आरोग्यबाबतच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईत चार पैकी एक कुटुंब आजारी असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच नागरिकांनी स्वतःची तब्येत जपणे गरजेची आहे.