आरक्षण न देण्याचे सरकारचे षडयंत्र; जरांगे पाटलांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्य सरकारने तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीला घेऊन गेल्या दोन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. या पार्श्वभूमीवर आज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, “सरकारला 40 दिवसांचा वेळ देऊनही त्यांनी आरक्षण जाहीर केलं नाही. म्हणजेच मराठ्यांचे पोरं मोठं होऊ नये, म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी षडयंत्र रचलंय” अशा शब्दात त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

पंतप्रधान आंदोलनावर बोलत नसतील तर..

त्याचबरोबर, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठा आरक्षण बाबतीत कसलाही शब्द काढला नाही. याचा अर्थ असा होतो की, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जाणीवपूर्वक पंतप्रधान मोदींना मराठा आरक्षण बाबतीत माहिती सांगितली नाही किंवा पंतप्रधान मराठा आरक्षणावर जाणीवपूर्वक बोलले नाहीत. जर का पंतप्रधान एवढ्या जवळ येवूनही देशव्यापी आंदोलनावर बोलत नसतील तर तो विषय जाणीवपूर्वक घेत नाहीत किंवा तो विषय त्यांना सांगितला गेला नसावा” असे देखील जरांगे पाटील म्हणले आहे.

त्यांना गोरगरिबांची गरज उरली नाही….

इतकेच नव्हे तर, “मराठ्यांच्या मनात पंतप्रधान यांच्याबद्दल काहीही वाईट नाही. त्यांच्या मनात चांगलचं होत. जर त्यांच्या मनात वाईट असतं तर पंतप्रधान यांच विमान शिर्डीत उतरु दिलं नसतं. पण पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मराठा आरक्षणासंदर्भात काहीही बोलले नाहीत. आता या तिघांना गोरगरिबांची गरज नाही राहीली. लोकांना वाटत होत की पंतप्रधान हे गोरगरीबांचे आहेत. पण आता पंतप्रधान यांना गोरगरिबांची गरज उरली नाही” असा गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केला आहे.