शिवछत्रपतींवरील ‘त्या’ विधानावर राज्यपालांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण; म्हणाले की….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारणार? असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केल्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यपालांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. ते जळगाव येथे बोलत होते.

कोश्यारी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत, मला जेवढे जानकारी आहे समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत म्हणून मी ते वक्तव्य केलं. इतिहासातील काही नवीन तथ्य मला काही लोकांनी सांगितले. त्या तथ्यानुसार मी पुढे पाहिल, असे पत्रकारांशी बोलताना कोश्यारी म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यपाल कोशारी यांच्या विधानानंतर शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. राज्यपालांनी संपूर्ण महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली. तर राज्यपाल म्हणजे भाजपचे नव्याने नेमलेले शिवव्याख्याते आहेत असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता.

Leave a Comment