कॉ.पानसरेंच्या खून प्रकरणात लक्ष घालण्याचे पालकमंत्री सतेज पाटलांनी कुटुंबियांना दिलं आश्वासन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कॉ. पानसरे यांच्या खुनास ५ वर्षे उलटली तरी तपास समाधानकारक झालेला नाही. गुन्हेगार फरार आहेत. गुन्ह्याचे वाहन व शस्त्रे यांचा शोध लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर श्रमिक प्रतिष्ठान व आयटक कामगार संघटनेच्या एका शिष्टमंडळाने मा. पालकमंत्री व गृह राज्यमंत्री श्री. सतेज पाटील यांची भेट घेतली. मेघा पानसरे यांनी त्यांना तपासाच्या सद्यस्थिती बाबत ज्ञात माहिती दिली. तसेच या खून प्रकरणा च्या तपासाचा संपूर्ण आढावा घेण्याची विनंती केली.

तपासात काय अडचणी आहेत, तो अद्याप पूर्ण का झालेला नाही याबाबत नव्या महाविकास आघाडी सरकारने लक्ष घालण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी मा. सतेज पाटील यांनी तपासाबाबत नवे सरकार गंभीर असून विधानसभा अधिवेशनादरम्यान मा. गृहमंत्री श्री. अनिल देशमुख यांच्या बरोबर एक बैठक आयोजित करण्यात येईल व त्यास आमंत्रित करण्यात येईल, असे सांगितले. त्यापूर्वी तपास अधिकारी व वकिलांशी चर्चा करून सखोल माहिती घेऊ, असे आश्वासन दिले.

कॉ. पानसरे यांच्या खुनाचा तपास होऊन सर्व गुन्हेगार व सूत्रधार यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी कॉ. दिलीप पवार, मेघा पानसरे, एस.बी. पाटील, आनंद परुळेकर, आय. बी. मुनशी, मल्हार पानसरे उपस्थित होते.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.