हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्यंतरी राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात शेतकऱ्यांनी लावलेल्या कांद्याची (Onion) नासधूस झाली होती . मुख्य म्हणजे, नाशिक, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये तर कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers) याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची (Onion Subsidy) घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आले होती. मात्र आता या घोषणेचा सरकारलाच विसर पडल्याचे दिसून येत आहे. कारण की, सरकारकडून कांद्याचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप कोणतेही नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे.
राज्य सरकारने, शेतकऱ्यांची नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी प्रती क्विंटल ३५० रुपये अनुदान रक्कम ठरवली होती. मात्र अद्याप ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली नाही. राज्य सरकारने सुमारे ८५० कोटी रुपये १५ ऑगस्टपर्यंत जमा करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु वास्तविक पाहता कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यावर ही रक्कम जमा झालेली नाही. तसेच सरकारकडून देखील याबाबत कोणतीही माहिती पुरविण्यात आलेली नाही. त्यामुळे आता, सरकारकडून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होईल असा सवाल महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने उपस्थित केला आहे. याबाबत गुरुवारी १७ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ नाशिक जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या अनुदानाप्रकरणी जाब विचारणार आहेत. याबाबतची माहिती संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली आहे. एकीकडे शेतकरी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या कारणाने हैराण झालेला असताना देखील सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.
शेतकरी मित्रानो, तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेला अर्ज करायचं असेल किंवा सरकारने दिलेल्या अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर आजच मोबाइल मध्ये Hello Krushi अँप डाउनलोड करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या आणि कोणताही खर्च न करता सर्व सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता. याशिवाय, रोजच्या पिकांचा बाजारभाव, जमीन मोजणी, सातबारा उतारा, फेरफार नोंदणी, अचूक हवामान अंदाज, कृषीविषयक सल्ले यांसारख्या अनेक सुविधा अगदी फुकट मध्ये मिळत आहेत. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi डाउनलोड करा.
दरम्यान, गेल्या 9 मार्च रोजी शेतकऱ्यांच्या झालेल्या कांदा नुकसान भरपाई साठी राज्य सरकारने 300 रुपये प्रति क्विंटर अनुदान देण्याची घोषणा अधिवेशनात केली होती. परंतु त्यानंतर पुन्हा याबाबत चर्चा झाल्यावर अनुदानात आणखीन पन्नास रुपयांची वाढ करून प्रती क्विंटर 350 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या संदर्भात सरकारने 27 मार्च रोजी अध्यादेश देखील काढला होता तसेच 15 ऑगस्ट च्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात येईल असे आश्वासन सरकारने दिले होते.
मात्र आता 15 ऑगस्ट तारीख उलटून गेली असताना देखील एकाही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात आलेली नाही. किंवा ही रक्कम कधी जमा होईल याबाबत देखील सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता शेतकरी सरकार विषयी संताप व्यक्त करताना दिसत आहेत. तसेच, सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम लवकर जमा करावी अशी मागणी महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे.