अली अस्लम अन्सारी यांची ‘दहा गुंठ्यातील’ यशोगाथा
परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे
अली अस्लम अन्सारी या पाथरीतील २७ वर्षीय अल्पभुधारक युवा शेतकऱ्याने भाडे तत्वावर दहा गुंठे जमिन घेऊन त्यात पॉलिहाऊस मधील गुलाब लागवडीतुन पुणे येथे मार्केटींग करून दुष्काळाशी दोन हात केले आहेत. महिण्याला तीस हजारावर कमाई करुन इतरांसाठी अन्सारी प्रेरणा देणारा ठरत आहे.
पाथरी शहरातील रहिवाशी असणारा पदवीधर शेतकरी अली अस्लम अन्सारी यास रेणाखळी या गावात केवळ अडीच एकर जमीन आहे. ती पण कोरडवाहु शेतात नेहमी वेगवेगळे प्रयोग करून शेतीत मजुर कमी लागावे या साठी तो टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ अवजारे तयार करून त्याचा शेत मशागती साठी उपयोग करतो. गत वर्षी एप्रिल,मे अस्लम ‘ ने पाथरीत दहा गुंठे जमिन भाडे तत्वावर घेऊन त्यात बँकेच्या अर्थ साह्याने जवळपास बारालक्ष रुपये खर्च करून यात पॉलिहाऊस उभे केले. यात तीन ट्रॉली शेणखत टाकून जमिनिची मशागत केली. त्यानंतर बॆड तयार करून त्यावर पुणे येथून डच गुलाबाच्या रोपांची लागवड केली. खत,पाणी,फवारणीचे नियोजन कृषी पदवी धारक त्याचे बंधू त्याला मार्गदर्शन करतात.
दर महिण्याच्या पंधरा तारखेला १९: १९: १९ या खताची साडेबारा किलोची मात्रा ते ड्रीप व्दारे देतात. या गुलाबांच्या रोपांची लागवड त्यांनी जुन जुलै महिण्यात केली असून लागवडी नंतर पंचावन्न दिवसात प्रत्यक्ष गुलाबाचे फुल उत्पादन सुरू झाल्याचे अली असलम सांगतात दररोज सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास स्वत: फुलांची तोडणी करून दोन फुटाजवळ फुलासह काडी काडी तोडून उमलत्या अवस्थेतील वीस फुलांचा एक बंच तयार करून तो विक्री साठी दररोज पुणे येथे जाणे येणे न परवडणारे असल्याने एक नामी शकल लढवत ट्रॅव्हलस ने चालकाकडे हे फुलांचे गुच्छ देऊन पुणे येथे दर दिवशी ट्रँव्हल्स व्दारे पाठवण्यात येतात.
[youtube https://www.youtube.com/watch?v=tJbbb5EhwV8&w=560&h=315]
पुणे येथे एका ऑटो रिक्षा वाल्यास महीना ठरवण्यात आला असून पाथरी येथुन ट्रेव्हल्स निघल्यानंतर या अॅटोचालकास फोन करून फुलांचे पायवलेल्या बंचाची संख्या सांगीतल्या नंतर तो ऑटोचालक ते फुलांचे बच उतरवुन पुणे बाजार पेठेत व्यापाऱ्यांना फुले पोहंचण्याचे काम करतो. एका फुलाच्या बंचाला एैशी रूपये दर मिळतो म्हणजेज एक फुल चार रुपयांना विक्री होते. सद्या दर दिवशी वीस फुलांचे चाळीस बंच निघत असून एैशी रुपया प्रमाणे त्याची विक्री होते.यातून खत फवारणी साठी महिना पंधरा हजाराचा खर्च होत असल्याचे अली अस्लम सांगतात. दहा गुठ्यात केलेल्या या गुलाबा साठी लाल माती गरजेचे असल्याचे ही ते आवार्जून सांगतात त्यांच्या या शेतात काळी माती असल्याने जमीनीतून बुरशी रोगाचा झाडावर मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव होत असून या रोगाच्या नियंत्रणा साठीच मोठा खर्च होत असल्याचे ते सांगतात. या फुलांची वाहातूक करण्या साठी त्यांनी मोटार सायकलला जोडता येणारी एक दोन टायर ची गाडी तयार केली आहे. एकंदरीतच तालुक्यात दुष्काळाची भयानता असतांनाही केवळ भाडेतत्त्वावर घेतलेल्या दहा गुठे क्षेत्रातून बारा महिने सातत्याने हजारो रुपये महिना मिळवता येतो हेच या तरूण पदवीधर शेतक-याने दाखऊन दिले आहे.
या पॉलीहाऊस साठी बँकेने मदत केली असून आता शासनाच्या नानाजी देशमुख योजनेत प्रस्ताव दाखल केला आहे. त्यातून चार लक्ष रूपये अनुदान मिळेल असे अन्सारी याने सांगितले.हे पॉलीहाऊस आष्टी रोड लगत गँस एजन्सीच्या पाठी मागिल शेतता तयार करण्यात आले आहे. स्वतःच्या मालकीच्या आडीज एकरात पाण्याची उपलब्धता नसल्याने शहराजवळ भाडेतत्वावर दहा गुंठे जमिन घेऊन फुलवली गुलाब शेती पदवी घेऊनही नौकरीच्या आशेवर न राहता मेहनत जिद व आत्मविश्वासातून दुष्काळासारख्या संकटावरी कशी मात करता येऊ शकते हे अली अस्लम अन्सारी यांनी दाखवुन दिले आहे.