कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी 103 अर्ज दाखल झाले असुन सदस्य पदासाठी एकूण 589 अर्ज दाखल झाले आहेत. तर आजअखेर सरपंच पदासाठी तब्बल 188 अर्ज, तर सदस्य पदासाठी 1 हजार 20 अर्ज दाखल झाले आहेत. मात्र 4 गावात सरंपच पदासाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही. अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने सुमारे 13 ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता असून 6 ग्रामपंचायतीचें सरपंचपदही बिनविरोध होणार आहेत. तालुक्यातील 4 ग्रामपंचायतीसाठी सरंपच पदाला अर्जच दाखल झालेला नाही. अर्ज छाननी सोमवार दि. 5 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून छाननी असणार आहे. बुधवार दि. 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने या दिवशी निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणर आहे.
सरपंच पदासाठी दाखल झालेले एकूण अर्ज पुढीलप्रमाणे गाव व एकूण संख्या ः हनुमानवाडी 4, जुने कवठे 4 वनवासमाची (खोडशी) 3, विजयनगर 7, हवेलवाडी 0, ओडोशी 4, चोरजवाडी 3, धावरवाडी 0, घराळवाडी 1, हणमंतवाडी 2, तारुख 5, वानरवाडी 2, दुशेरे 4, गोंदी 4, हिंगनोळे 6, सावळवाडी 1, चिंचणी 0, घोलपवाडी 3, अंतवडी 2, शामगाव 7, मस्करवाडी 3, भांबे 1, आरेवाडी 1, डेळेवाडी 0, आणे 5, कुसुर 3, अंधारवाडी 1, कळंत्रेवाडी 3, पाडळी (हेळगाव) 7, कालगाव 2, मनू 6, कोरेगाव 6, गणेशवाडी 1, पश्चिम सुपने 3, रेठरे खुर्द 15, जुळेवाडी 9, कासारशिरंबे 7, सुपने 5, किवळ 4, येळगांव 7, आटके 6, चरेगाव 14, तळबीड 10, वडगाव हवेली 7 असे एकूण एकूण 188 अर्ज दाखल झाले आहेत.
तर आजअखेर सदस्य पदासाठी दाखल झालेले एकूण अर्ज पुढीलप्रमाणे, हनुमानवाडी 20, जुने कवठे 31, वनवासाची (खोडशी) 28, विजयनगर 19, हवेलवाडी 7, ओडोशी 17, चोरजवाडी 7, धावरवाडी 22, घराळवाडी 7, हणमंतवाडी 10, तारुख 21, वानरवाडी 8, दुशेरे 30, गोंदी 11, हिंगनोळे 19, सावळवाडी 7, चिंचणी 6, घोलपवाडी 11, अंतवडी 16, शामगाव 28, मस्करवाडी 7, भांबे 6, आरेवाडी 7, डेळेवाडी 17, आणे 30, कुसुर 19, अंधारवाडी 9, कळंत्रेवाडी 9, पाडळी ( हेळगाव) 30, कालगाव 28, मनू 24, कोरेगाव 24, गणेशवाडी 9, पश्चिम सुपने 15, रेठरे खुर्द 46, जुळेवाडी 40, कासारशिरंबे 44, सुपने 32, किवळ 41, येळगांव 40, आटके 49, चरेगाव 53, तळबीड 51, वडगाव हवेली 64 असे एकूण एकूण 1020 अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कराडच्या नवीन प्रशासकीय कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे भेदा चाैकातून येणारी वाहतूक शहर पोलिस स्टेशन शेजारून शाहू चाैकाकडे वळविण्यात आली होती.